पुलगांव केन्द्रीय गोळा बारुद भंडारच्या परीसरातील सिमाकंनाचा विषय लवकरच मार्गी लागणार खा. रामदास तडस यांची माहिती

वर्धा/प्रतिनिधी केन्द्रीय गोळा बारुद भंडार पुलगांवच्या परीसरात सामान्य जनता व केन्द्रीय गोळा बारुद भंडारच्या प्रशासनामध्ये हद्दीवरुन वारंवार वाद होत होता, यामुळे बांधकाम करणे, बांधकाम वाढविणे, घरांची दुरुस्ती करणे, शासकीय योजनेतुन घरकुल निर्मीती करणे, खरेदी विक्री, मोजनी इत्यादी अनेक विषय रेंगाळत होते. या बहुप्रलंबीत घटनेची वास्तविकता समजुन घेऊन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये प्रत्यक्ष प्रश्न उपस्थित करुन जिल्हा प्रशासन व रक्षामंत्रालय यांनी योग्य समन्वय करुन नागरिकांना व परीसरातील भुमीधारकांना न्याय देण्याची मागणी केली होती. आज प्रशासनामध्ये अत्यंत गतीमान अश्या हालचाली सुरु असुन सदर विषय मार्गी लावण्याकरिता प्रशासन कार्यरत झाल्याची माहिती देण्यात आली.

नागरिकांना हक्काच्या स्वतःच्या जागेवर कुठलेही कार्यवाही करता येत नव्हती. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वप्रथम केन्द्रीय गोळाबारुद भांडार यांची सुरक्षा प्राथमिकता असुन या सोबतच नियमानुसार नागरिकांना आवश्यक परवानगी देण्याची मागणी परीसरातील अनेक नागरिक व शेतकरी बांधव वारंवार करीत होते, या सर्वांना न्याय देण्याकरिता मी केन्द्रीय रक्षामंत्री महोद्यांना पत्र लिहीले, लोकसभेत प्रश्न उपस्थित केला, जिल्हाधिकारी वर्धा व पुलगांव कॅम्पचे ब्रिगेडीयर यांच्याकडे विषय नमुद केला तसेच सर्व प्रकारे वारंवार कार्यालयीन पाठपुरावा सुरु होता, या विषयाला लोकसभा प्रश्नानंतर गती मिळाली असुन पुलगांव कॅम्पची सुरक्षा प्राथमिकतेत ठेवून सर्व नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता माझा प्रयत्न आहे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी दिले.