लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाची बंदद्वार चचा

वर्धा/प्रतिनिधी जिल्ह्यात मागील तीन वर्षात दारूविक्री, अवैध व्यवसाय करणार्यांनी चांगलेच डोके वर काढले होते. जिल्ह्याचा गुन्हेगारी उच्चांक वाढला होता. आता जिल्ह्यातील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात येणार असून गुन्हेगारांचीही गय केली जाणार नाही. यासाठी पोलिस विभाग आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज्ा झाली आहे. खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांची जिल्हाधिकार्यांच्या दालनात दोन तास बंदद्बार चर्चा झाली. बैठकीदरम्यान, जिल्ह्यातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. मागील काळात शहरात गुन्हेगारी आणि अवैध व्यवसाय करणार्यांना पोलिसांकडून अभय दिले जात होते, असे लोकप्रतिनिधींनी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या लक्षात आणून दिले. पोलिस अधीक्षक हसन यांनी यापुढे आता असे होणार नाही. जिल्ह्यातील अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस विभागाला महसूल यंत्रणेनेही सहकार्य करण्यास सांगितले.

चर्चेदरम्यान जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, अमली पदार्थांची तस्करी करणार्या तसेच सेवन करणार्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी ओशासन दिले. इतकेच नव्हे तर शहरासह शहरालगतच्या ग्रामंपचातींच्या हद्दीत होणारे अतिक्रमण आणि अवैध व्यवसायदेखील पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील शंभराहून अधिक जागांची निवड करण्यात आली असून पोलिसांसह महसूल आणि प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून या सर्व ठिकाणांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे गुन्हेगारांना आता अभय दिले जाणार नाही. वाळूची अवैधरित्या होणारी वाहतूक आणि साठेबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, आता अवैधरित्या वाळूची वाहतूक आणि साठवणूक करणार्या वाळू तस्करांच्याही मुसक्या आवळण्यात येणार आहेत. पोलिस विभागासह महसूल यंत्रणेने याबाबत ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. लवकरच वाळू तस्कर कोठडीत राहणार आहेत, असेही पोलिस अधीक्षक हसन यांनी सांगितले.