न्यायमूर्ती चंद्रचूड होतील देशाचे सरन्यायाधीश

नवी दिल्ली/प्रतिनिधी देशाचे सरन्यायाधीश यूयू ललित आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणार आहेत. आज ते न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना एक पत्र सुपूर्द करतील.ज्यामध्ये त्यांना देशाचे पुढील सरन्यायाधीश बनवण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांच्या उपस्थितीत त्यांना हे पत्र सुपूर्द करण्यात येणार आहे. याशिवाय न्यायमूर्ती यूयू ललितही याच प्रकरणात कायदा मंत्रालयाला पत्र लिहून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणार आहेत. विधी आयोगाने उगख यांना त्यांच्या उत्तराधिकारीच्या नावाची शिफारस करण्यास सांगितले होते. न्यायमूर्ती यूयू ललित ८ नोव्हेंबरला सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. पॅनेलमध्ये असलेले न्यायमूर्ती चंद्रचूड उहरपवीरलर्हीव आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांनी सर्वोच्च न्यायालयातील ४ न्यायाधीशांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवला होता, हे विशेष. त्यामुळे सरन्यायाधीश यूयू ललित यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमकडून चार न्यायाधीशांची नियुक्ती होऊ शकली नाही. नियमांनुसार, कोणताही उगख निवृत्तीच्या फक्त एक महिना आधी कॉलेजियमचे नेतृत्व करताना