जल जीवन मिशनमुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार- खा. रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी देशाचे लोकप्रीय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी यांनी प्रत्येक घराला नळजोडणी करण्याकरिता व २०२४ पर्यंत देशातल्या प्रत्येक घरात पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचा उद्देशाने ” हर घर नल, हर घर जल” योजना जलशक्ती मंत्रालया व्दारा कार्यान्वीत केलेली आहे, जल जीवन मिशनच्या माध्यमातून दररोज एका व्यक्तीला ५५ लिटर पाणी पुरवण्याचे लक्ष्य आहे आणि देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरासाठी नळ जोडणीची तरतूद केल्यामुळे ग्रामीण जनतेच्या जीवनमानात सुधारणा होईल. जल जीवन मिशनमुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले. येळाकेळी येथे जल जीवन मिशन अंतर्गत रु. १७४.४८ लक्ष रुपयाच्या पाणी पुरवठा योजनेचा भुमीपूजन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाला भाजपा जिल्हयाध्यक्ष सुनिल गफाट, माजी जि.प.सदस्य सौ. सोनाली अ.कलोडे, प.स.माजी सभापती अशोक मुडे, अशोक कलोडे, प.स. माजी सदस्य बंडु गव्हाळे, सरपंच सौ.भारती दे. चलाख, माजी सरपंच रमेश पिंपळे, जामनी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. प्रिती गव्हाळे, उपसरपंच अनिल येलोरे, खैरी कामठीच्या सरपंच अनुसया सुरजुसे, उपसरपंच विद्या पोहाने, आमगावचे सरपंच अभय ढोकणे उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हयाध्यक्ष सुनिल गफाट, माजी जि.प.सदस्य सौ. सोनाली अ.कलोडे, प.स.माजी सभापती अशोक मुडे, अशोक कलोडे यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला तंटामुक्ती समिती अध्यक्ष रामचंद्र बारहाते, येळाकेळी ग्रा.प.सदस्य सर्व श्री. अशोक येल्लोरे, हितेशभाऊ भांडेकर, वसंत करनाके, भाऊराव कोहळे, राहुल येल्लोरे श्री. भाऊरावजी कोहळे ग्रामपंचायत सदस्या, सौ. शीतल गडकर, सौ. ममता घोंगडे, सौ. वंदना चलाख, सौ. प्रियदर्शनी ठाकरे, सौ. उषाताई उडाण, सौ. विमल कंडे, ग्रामविकास अधिकारी डी.एस निवटे, येळाकेळी सर्व पदाधिकारी तसेच सतीश पिपंळे, वासुदेव लिचडे प्रदिप भोयर, रामकृष्ण मिटकर, माजी सदस्य राजु उडाण, पुष्पाबाई झाडे, राजु वामन उडाण, विवेक धोटे रविंद्र कोहळे छाया लटारे, कल्पना खोबे, मिना डोंबरे, वैशाली डोंबरे, अनिता साहारे, प्रभा घोंगडे, संगीता बारसाकडे, रामेेशर कुनघटकर, बाबाराव कोढाळे,आकाश लटारे, देवानंद बाराहाते,विकास भांडेकर, बाबाराव पिपंळे, ईेशर झाडे, सुधाकर झाडे, प्रतिभा तेलंग, आशा खंडारे, आशा गवई, सिमा नाईक, लक्ष्मी मानकर, प्रतिज्ञा गवई, शालु तेलंग, पुनम खंडारे,सिंधु नाईक, रमा कळमकर, बापुराव तेलंग, शोभा खिल्लारे व मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.