देशात २०२६ पासून धावणार पहिली बुलेट ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

नवी दिल्ली/प्रतिनिधी रेल्वेमंत्री अिेशनी वैष्णव यांनी शुक्रवारी अहमदाबाद दौऱ्यावर असताना बुलेट ट्रने बाबत माठे ी घाषे णा के ली आह.े दशे ातील पहिली बुलेट ट्रेन २०२६ मध्ये धावणार असल्याचे अिेशनी वैष्णव यांनी सांगितले आहे. तसेच, सध्या बुलेट ट्रेनचे ट्रॅक ९२ पिलर तयार करण्यात आले आहेत. जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन बांधण्यात येणार आहे. याशिवाय, १९९ स्टेशन जागतिक दर्जाची करण्यासाठी मास्टर प्लॅन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत अहमदाबाद रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाचे बनवण्यात येणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस दुर्घटनेबाबत रेल्वेमंत्री अिेशनी वैष्णव म्हणाले की, देशातील सर्व रेल्वे ट्रॅक अजूनही जमिनीवर आहेत. त्यामुळे गुरांचा प्रश्न कायम आहे. मात्र, अशा समस्यांना तोंड देण्यासाठी गाड्यांचे डिझाइन तयार केले जात आहेत. कालच्या घटनेनंतरही वंदे भारत ट्रेनला काहीच झाले नाही. पुढचा भाग दुरुस्त केल्यानंतर पुन्हा गाडी सुरू झाली आहे. मुंबईहून गांधीनगरला जाणारी देशातील पहिली हाय-स्पीड ट्रेन असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला गुरुवारी अहमदाबादपूर्वी बटवा आणि मणिनगर दरम्यान एक म्हैस धडकली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रेनचा पुढील भाग तुटला आहे. आता ही गाडी पूर्णपणे दुरुस्त करून परत आणण्यात आली आहे. काल सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. वंदे भारत एक्सप्रेस सध्या फक्त तीन मार्गांवर धावत आहे.