हिंदूंना सुसंघटित करणे हेच आरएसएसचे खरे ध्येय; मोहन भागवतांचे रोखठोक विधान

शिलाँग/प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करणारी एखादी संघटना नसून हिंदू समाजाला सुसंघटित करणे हेच खरे तिचे ध्येय आहे. भारताचा सर्वांगीण विकास व्हावा, ते साध्य करण्यासाठी स्वयंसेवक शाखा कार्यपद्धतीतून काही शिस्त शिकतात, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. मेघालयची राजधानी शिलाँग येथील यू सोसो थाम सभागृहात जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. आपण अनादी काळापासून एक प्राचीन राष्ट्र आहोत परंतु आपली सभ्यता आणि मूल्ये विसरल्यामुळे आपण आपले स्वातंत्र्य गमावले. आमची एकमेकांमधील बंधुत्वाची शक्ती ही अध्यात्मात निहित असलेली आमच्या जुन्या मूल्यावरील आमची जन्मजात श्रद्धा आहे. या देशाच्या शोशत सभ्यतेच्या मूल्यांना आपल्या देशाबाहेरील लोकांनी हिंदुत्व असे नाव दिले होते. आम्ही हिंदू आहोत पण हिंदूची कोणतीही विशिष्ट व्याख्या नाही जरी ती आमची ओळख असली तरीही. भारतीय आणि हिंदू हे दोन्ही शब्द समानार्थी शब्द आहेत. खरं तर ती भौगोलिक-सांस्कृतिक ओळख आहे याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले.