उपमुख्यमंत्री फडणवीस वर्धेचे पालकमंत्री

वर्धा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याला दमदार पालकमंत्री मिळाले असून विकासही जोरदार होणार यात शंका नाही. पालकमंत्र्यांची घोषणा कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज या विषयाला पूर्णविराम मिळाला असून राज्यातील विविध जिल्ह्यांसाठीची पालकमंत्री घोषित करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच अन्य काही जिल्ह्यांचे पालकत्व ही त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागल्याने जिल्ह्याचा विकासाचा रथ सुसाट वेगाने धावेल अशी आशा जिल्हावाशी नक्कीच करू शकतात. भाजपा पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.