महिला सक्षमीकरणासाठी राजा राममोहन रॉय यांचे अद्वितीय योगदान- निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे

वर्धा/प्रतिनिधी महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी सतीबंदी, विधवा पुनर्विवाह असे कायदे करण्यासाठी व स्त्रियांना त्यांचे उचीत अधिकार प्राप्त करून देण्यासाठी झटणारे राजा राममोहन रॉय यांचे कार्य अद्वितीय होते, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी केले. आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या २५० व्या जयंती निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरणावर शालेय मुलांच्या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचा शुभारंभ श्रीमती मोरे यांच्याहस्ते झाला. त्यावेळी समारोपीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने, राज्य ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष गजानन कोटेवार, उपशिक्षणाधिकारी श्रीमती तळवेकर, प्रबोधनकार तुकाराम गोडे महाराज, लायन्स क्लब गांधी सिटीचे अनिल नरेडी आदी उपस्थित होत्.

रॅलीचा शुभारंभ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयापासून झाला. आंबेडकर चौक, गांधी चौक मार्गे विकास विकास भवन येथे रॅली पोहोचल्यानंतर तेथे समारोपिय कार्यक्रम झाला. रॅलीत जिजामाता विद्यालय, केसरिमल हायस्कूल, मौलाना आझाद उदर्ु हायस्कूल, रत्नीबाई हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, लोकविद्यालय या शाळा सहभागी झाल्या होत्या. रॅलीत विविध देखावे सादर करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमात सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याकरिता कला महोत्सव अध्यक्ष संदीप चिचाटे, आशिष पोहाने, तुकारामजी गोडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ऋतुजा चुटे, पायल भस्मे, प्रणाली मंडलिक, योगेश निखार, प्रशांत सुटे, रणजित नगराळे, विक्की वनस्कर, सहभागी शाळेतील प्राचार्य व शिक्षकांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन सोनोने यांनी केले. सूत्रसंचालन संदीप चिचाटे यांनी केले तर आभार आशिष पोहाणे यांनी मानले. कार्यक्रमात रांगोळीकार आशिष पोहाणे यांनी राजा राममोहन रॉय यांची काढलेली रांगोळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली तर तुकाराम गोडे यांनी मी राजा राममोहन रॉय बोलतोय ही एकपात्री सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर गवळी, मिलिंद जूनगडे, विशाखा मिश्रा, राजू खरतळकर यांनी सहकार्य केले.