आष्टी पोलिसांची धाडसी कारवाई
मृतदेह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन च्या जवानांचे मदतीने शोधून बाहेर काढला
प्रतिनिधी/दै. जन-संग्राम
आष्टी (झ.) : सौरभ सुनिल चचाणे वय अं.१९ वर्ष रा.ता.आष्टी जि.वर्धा हा १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ०२/०० वाजता गावाला लागुन असलेल्या कपिलेश्वर धरणात बुडाला होता दोन दिवस झाले वर्धा येथील आरसीपी आपत्ती व्यवस्थापन पथक यांनी दोन दिवस झाले शोध मोहीम राबवली परंतु पर्यतनांना यश मिळत नसल्याने शेवटी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी आष्टी पोलिस ठाण्याचे थानेदार राजेश जोशी यांनी अकोला पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवन-रक्षक दिपक सदाफळे यांना घटनेची माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले दिपक सदाफळे जिव-रक्षक यांनी आपले सहकारी मयुर सळेदार, शेखर केवट,निलेश खंडारे,विष्णु केवट,शिवम वानखडे,अमित जवके, हर्षल वानखडे यांचेसह शोध व बचाव साहीत्यासह घटनास्थळी १६ ऑगस्ट रोजी सकाळीच ०३/०० वाजता पोहचताच ट्रेसिंग केले यावेळी धरणात ३५ ते ४० फुट खोल पाणी असल्याचे निदर्शनास आले लगेच रेस्क्यू बोट तयार केली आणी सर्च ऑपरेशन सेटअप तयार करुन सर्च ऑपरेशन चालू केले असता अवघ्या एका तासातच मृतदेह शोधून पोलीसांचे ताब्यात दिला .
प्रेत आष्टी येथील रुग्णालय येथे दाखल असून झच् झाल्यावर प्रेत नातेवाईक यांचे ताब्यात देण्यात येईल. मृतक यांचा अंत्यविधी दुपारी आष्टी येथेच होईल. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी सरिता चव्हाण यांचे मार्गदर्शनत आष्टी पोलिस ठाण्याचे थानेदार राजेश जोशी ,पिएस आय हर्षल नगरकर , पिएसआय निलेश भिलावे, हे.कॉं.सतिश नंदागवळी साहब, हे.कॉं.बिबिशेन केंद्रे, पो.कॉं.संदिप शिंदे, पो.कॉं.राज खडसे, पो.कॉं.अश्विन चव्हाण साहेब, संजय दिघेकर, पवन देशमुख व इतर पोलिस स्टाफ यांनी केली.








