जिल्ह्यात ३२ हजारावर शेतकऱ्यांना ३१६ कोटी रुपयांची कर्जमाफी- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
८२ हजार शेतकऱ्यांना १७० कोटी रुपयांची वीज सवलत
१ लाख ३२ हजार रुग्णांना उपचारासाठी १३६ कोटींचे सहाय्य
प्रतिनिधी/दै. जन-संग्राम
वर्धा : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या ३२ हजार ६३५ इतकी असून ३१६ कोटीच्या कर्जमाफीचा लाभ त्यांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात १० हजार कोटी जमा करण्यात आले आहेत, असे पालकमंत्री डॉ.पंकट भोयर यांनी सांगितले.
पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात भारताचा ८० व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर करताना पालकमंत्री संदेशपर भाषण करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वानमथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी शोभिका पाठक तसेच माजी सैनिकांचे कुटुंबिय, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुरुवातीस पालकमंत्रींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व शूरवीर, देशक्तांना नमन केले. स्वातंत्र्यानंतर देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेणे फार मोठे आव्हान होते. देशासह आपले राज्य देखील आज विकासाच्या बाबतीत झपाट्याने पुढे जात आहे. गेल्या दहा बारा वर्षांत देशाने विकासाच्या बाबतीत वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांना वीज सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील राज्य शासनाने घेतला. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून जिल्ह्यातील ८२ हजार ६४४ शेतकऱ्यांना मार्च अखेर पर्यंत १२० कोटींची वीज सवलत देण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून प्रत्येكى ६ हजार बाप्रमाणे जिल्ह्यातील १ लाख ३ हजार शेतकऱ्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू केली. जिल्ह्यात या योजनेतून १ हजार ८० प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली तर २४ कोटींहून अधिक रकमेचे बँक कर्ज वितरीत करण्यात आले. मंजूर प्रकल्पापैकी १५० उद्योग कार्यान्वित देखील झाले आहेत. या प्रकल्पांना ९ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना विनामूल्य आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वी आपण आरोग्य अमृत महोत्सव राबविला. विधानसभा मतदारसंघानिहाय आयोजित या शिबिरात २१ हजार १२२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत विविध आजार आढळून आलेल्या रुग्णांना पुढील उपचार देखील आपण उपलब्ध करून देणे आहे.
तळेगाव (शामजीपंत) येथे १५५ कोटी खर्चाचे ३०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले. हिंगणघाट येथे १५१ कोटी खर्चाची ४०० खाटांची नवीन रुग्णालय इमारत मंजूर झाली. हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील होत आहे. जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम होत आहे, आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेतंर्गत ५ लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जातात. जिल्ह्यात १ लाख ३२ हजार रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी १३६ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले
पायाभूत सुविधांच्या उभारणीवर आपण भर देत आहोत. गेल्यावर्षीं २३ कोटींचे वनभवन आपण मंजूर करून घेतले. ईडापूर येथे नवीन जिल्हा कारागृहाची निर्मितीसाठी १२० एकड़ जागा, सहकार संकुलासाठी २ एकर जागा मंजूर झाली आहे. आर्वी व देवळी येथे तालुकास्तरीय एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासाठी प्रत्येकी २ कोटी ३८ लाख व २ कोटी ५० लाख खर्चाच्या इमारती मंजूर झाल्या. जिल्हास्तरीय महिला व बाल विकास भवनसाठी १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आपण केला आहे. महिलांसाठी हक्काचे ठिकाण या भवनाच्या रूपाने उभे राहणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
पुलगाव येथे वर्धा नदीवर तसेच आजनसरा येथे यवतमाळ वर्धा जिल्हा सिमेवर प्रत्येكى ४० कोटी रुपये खर्चाचे मोठे पूल बांधण्यात येत आहेत. आंजी येथे २६ कोटी रुपये खर्च करून ग्रामीण रूग्णालय व सेलू येथे ४७ कोटी रुपये खर्च करून न्यायालयीन इमारत बांधण्यात येत आहे. यापूर्वी कधीही झाली नसेल इतकी विकासाची कामे जिल्ह्यात होत आहे. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर आपला भर आहे. त्यामुळे पोलिस विभागास जिल्हा नियोजनमधून ५ कोटी ७१ लाख उपलब्ध करून देण्यात आला. जिल्ह्यात लखपती दीदी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला. स्वयंसहायता समूहातील १ लाख ४१ हजार महिलांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवून लखपती दीदी बनविण्यात आल्या आहेत.
महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी आणि कार्यक्षम होत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज राजाराज अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ४२ हजारार महसूल सेवा व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येतात. गेल्यावर्षीं राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दरम्यान राबविण्यात आलेल्या सेवा पंढरवाड्यात ७२ हजारावर लाभर्ध्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे.
बोर अपलऱ्या जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी व्याघ्र प्रकल्प आहे. येथे हमखास बाघ्याचे दर्शन होत असल्याने गेल्या काही दिवसांत पर्यटकांची संख्या वाढली आहे. येथे पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी १० कोटींची विकास कामे केली जात आहे. मृद व जलसंधारणाचे महत्व भावी युवा पिढीला महत्व पटवून देण्यासाठी १५ ते २१ ऑगस्ट या कालावधीत जलसंधारण सप्ताह राबविण्यात येत आहे. याअंतर्गत दि.२१ ऑगस्ट रोजी महा वॉकॅथॉन तसेच युवासाठी जलसंधारण या विषयावर इंस्टाग्राम रील स्पर्धा आयोजित असून या चांगल्या उपक्रमास योगदान देण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी यावेळी केले.
सुरुवातीस पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केले. त्यानंतर परेड निरीक्षण तसेच पोलिस दलाच्यावतीने मानबंदेचा कार्यक्रम पार पडला. शालेय विदयार्थ्यांनी देशक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी वीर माता, वीर पलीर्चा सत्कार तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव देखील पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आला.








