नंदोरी सर्कलमध्ये मोठा पक्षप्रवेश; सरपंच ईश्वर सुपारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रवेश
प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : नंदोरी सर्कल व आरंभा ग्रामपंचायतीचे सरपंच ईश्वर सुपारे यांच्यासह अनेक माजी सरपंच व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या हस्ते पक्षतुतारी स्विकारण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, गणेश वैरागडे, संतोष घोडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पक्षात ईश्वर सुपारे (सरपंच, आरंभा), मोतीबाबा झाडे, मधुकर उचले, कुंडलोक कामडी, स्वप्नील धोटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला. सर्वांनी पक्षाच्यालोकाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास दर्शवला. या वेळी जिल्हाध्यक्ष अतुलवांदिले म्हणाले, युवक आणिग्रामपातळीवरील नेतृत्व हेच राष्ट्रवादीचेबळ आहे. पक्ष विचार, विकास आणि विश्वास यांवर आधारित असून स्थानिक स्वराज्य निवडणुकांत ही नवी ऊर्जा निर्णायक ठरेल. कार्यक्रमाला प्रवीण जायडे, डॉ.प्रवीण खेडकर, तुषार थुटे, संदीप उईके, बालू कारमोरे आदी मान्यवर उपस्थित होते.









