ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना उच्च शिक्षणासाठी २० लाखापर्यंत कर्ज सुविधा

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : विविध जाती धर्माच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सधी निमाण हाऊन त्याना चागला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी राज्य शासनाच्यावतीने केवळ शैक्षणिक सुविधांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहे. इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील रक्कमेत दिलासा देण्यासाठी व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवरील उच्च शिक्षणावर फार मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे असे शिक्षण पुर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना शैक्षणिक कर्ज घ्यावे लागत. इतर मागास वगातील अशा विद्याथ्याना घतलल्या कर्जावर राज्य शासनाच्यावतीने व्याजाचा परतावा दिला जातो. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी १० लाख व परदेशी अभ्यासक्रमासाठी २० लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय १७ ते ३० वर्षे असावे.

विद्यार्थी इतर मागास वर्गातील तसेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार विद्यार्थ्यांची ग्रामीण व शहरी भागाकरीता कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. अर्जदार विद्यार्थी इयत्ता १२ वी मध्ये ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमांमध्ये आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम, कृषी, अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान या अभ्यासक्रमाचा समावेश आह.

राज्य व देशातगत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता बँकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाच्या खर्चाचा समावेश आहे. परदेशी अभ्यासक्रमांमध्ये आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, विज्ञान, कला या अभ्यासकमाचा समावेश आहे. परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता बँकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये फक्त शक्षणिक शुल्क, पस्तक, साहित्य खरेदीचा समावेश आहे. परदेशी अभ्यासक्रमांतर्गत शैक्षणिक कर्ज घेतलेल्या विद्यार्थ्यांनी व्याज परताव्याचा लाभ मिळविण्यासाठी परदेशी अभ्यासक्रमासाठी जागतिक रँक २०० पेक्षा आतील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला असावा. तसेच परदेशी अभ्यासक्रमाकरीता आवश्यक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *