पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते ८ उमेदवारांना नियुक्ती आदेश
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबधक कायद्यान्वये खुन प्रकरणाच्या पिडीत कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्याचे धोरण आहे. त्यानुसार रिक्त जागांची उपलब्धता आणि लाभार्थी उमेदवारांच्या पात्रतेनुसार जिल्ह्यातील अनुसूचित जाती कुटुंबातील ८ उमेदवारांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते शासकीय नोकरीचे नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्ह्यात पात्र ३० उमेदवारांपैकी काही नियुक्त्या इतर जिल्ह्यात देण्यात आल्या आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नियुक्ती आदेश वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त अंकेश केदार, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी गिताजली निकम, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, सालाडचे उपसरपंच आशिष कुचेवार आदी उपस्थित होते. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबधक कायद्यान्वये पिडीत व्यक्तीस १ ते ८ लाख रुपयांपर्यंत प्रकरणपरत्वे मदत दिली जाते. अनुसूचित जाती जमाती या घटकातील ज्या कुटुंबात खुनासारखा गंभीर प्रकार घडलेला असतो, अशा कुटुंबातील पात्र व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात येते. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंब वाऱ्यावर न सोडता त्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्वपुण निणय घतला असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यावेळी म्हणाले.
जिल्ह्यात ३० कुटुंबातील उमेदवार नोकरी मिळविण्यास पात्र आहे. यापैकी ८ उमेदवारांना वर्धा जिल्ह्यात तर चंद्रपुर २, गडचिरोली ७, भंडारा १, नागपूर १ याप्रमाणे नियुक्ती देण्यात आल्या आहे. ११ कुटुंब अनुसूचित जमातीतील असल्याने या उमदवारांना आदिवासी विकास विभागाच्यावतीने नियुक्त्या देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. नियुक्त्या देण्यात आलेल्या ८ उमेदवारांमध्ये पुजा आनंदरावरनधिर, राहुल ज्ञानेश्वर वाहने, निलेश वसंतराव हातमोडे,स्वप्नील सुरेश ओंकार, प्रगती गजानन देवतळे, विकासदौलतराव शंभरकर, शुभम रमेश घोरपडे, मन्टी अशोकरावतायवाडे या उमेदवारांचा समावेशआहे. समाजकल्याणच्यानिवासी शाळा, वसतीगृहांमध्ये वेगवेगळ्या पदांवर हे उमेदवार कार्यरत राहणार आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यकआयुक्त अंकेश केदार यांनी केले. संचलन समाजकल्याणनिरिक्षक शरद निबुदे यांनी केले. कार्यक्रमास उमेदवारांसह त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.









