विद्या विकास ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बाजी; अनुष्का वडुलेआणि प्रियांशू भगतचे यश

प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : येथील विद्या विकास ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत पदकांची लयलूट केली आहे. ‘नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप’मध्ये कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला असून कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

अनष्का आणि प्रियाशची चमकदार कामगिरी ११ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी अनुष्का दिनेश वाडुळे हिने १७ वर्षांखालील वयोगटात ‘कराटे काता’ प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून कांस्य पदक पटकावले. तसेच ११ वी विज्ञानाचाच विद्यार्थी प्रियांशू प्रवीण भगत यानेही याच वयोगटात (ण-१७) काता प्रकारात तृतीय स्थान मिळवून पदक प्राप्त केले.

अनुष्काची किकबॉक्सिंगमध्येही चांदी अनुष्का वाडुळे हिने केवळ कराटेमध्येच नव्हे, तर किकबॉक्सिंगमध्येही यश मिळवले आहे. तिने १७ वर्षांखालील वयोगटात (४८ किलो वजन गट) ‘योद्धा मार्शल आर्ट्स’तर्फे खेळताना द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदक जिंकले. अनुष्काने यापूर्वीही शालेय क्रीडा स्पर्धा आणि इतर विविध खेळांमध्ये अनेक पदके जिंकून आपली क्रीडा क्षेत्रातील पकड मजबूत केली आहे.

मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्या विकास शिक्षण सस्थच अध्यक्ष डा. उमेशजी तळसकर सर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. विद्या विकास ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री नितेश रोडे सर, पर्यवेक्षक इंगोले सर, क्रीडा शिक्षक राकेश लोणकर सर, भूमिका वीरूळकर, कोच गोपाल कोटेवार आणि इतर सर्व शिक्षकवृंदांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे हिंगणघाट परिसरात विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *