वर्ध्यात काँग्रेसचे सुधीर पांगुळ, देवळीत अपक्ष किरण ठाकरे विजयीदिलीप पिंपळे

दै.जन-संग्राम वर्धा : वर्ध्यात मित्र प्रेम व देवळीत पत्नी प्रेम भाजपाला महागात पडले असून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे भाजपाला महागात पडले आहे, यात जनसंग्राम न्यूजचे केलेले भाकीत ठरले खरे आहे. वध्यात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सुधीर पांगुळ यांनी भाजपाचे निलेश किटे यांचा ७१०२ मताने पराभव केला तसेच देवळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांनी भाजपाच्या शोभाताई तडस यांचा १६२४ मतानी पराभव केला.

देवळीत भाजपचे १६ नगरसेवक काँग्रेसचे ४ नगरसेवक तर वर्धेत भाजपा २५ काँग्रेस ५ राष्ट्रवादी अजित पवार गट २ राष्ट्रवादी शरद पवार गट ५ व अपक्ष ३ उमेदवार विजयी झाले आहे.

झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून वर्धा येथील पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचे जवळचे मित्र निलेश किटे, तर देवळीत माजी खासदार रामदासजी तडस यांच्या पत्नी शोभाताई तडस यांना झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून वर्धा येथे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचे जवळचे मित्र निलेश किटे व देवळीत माजी खासदार रामदासजी तडसयांच्या पत्नी शोभाताई तडस यांना उमेदवारी देण्यात आल्याने या दोन्ही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यात प्रचंड रोष निर्माण झाला होता.

त्यामुळे नाराज असलेल्या २२ भारतीय जनतापार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षाचाझेंडा हाती घेतला होता. पक्षासोबत बंडखोरी करुन उमेदवारी दाखल केली होती, त्याचा ज्वालामुखी फुटल्याने या दोन्ही ठिकाणीभाजपाला लाजिरवाना पराभव पत्करावालागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *