The post अस्थिकलशाकरीता लॉकर या अभिनव उपक्रमाचा आरंभ appeared first on .
]]>कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगणघाट मतदार संघाचे आमदार समिर कुणावार हें होते. उद्घाटक म्हणून हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधीर कोठारी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणघाट शहरातील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ.प्रकाश लाहोटी, रा.सु बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बालाजी राजुरकर, समाजसेवी आशिष कासवा व नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री विशाल ब्राम्हणकर प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मत्यू हा अटळ आह. परंत मृत्युला सुंदर बनविण्याचे कार्य संस्थेच्या वतीने होत आहे.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थि ह्या त्यांच्या घरच्यांसाठी सोन्या-चांदीपेक्षाही मौल्यवान असतात व त्या गंगेत विसर्जीत करण्यापूर्वी सुरक्षितपणे ठेवता याव्यात अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. ही गरज लक्षात घेत संस्थेच्या वतीने सुरक्षितपणे व नि: शुल्क लॉकरची व्यवस्था करण्यात आली व ही कल्पना संस्थेला सुचल्याबद्दल संस्थेच्या या अभिनव व कल्पक बुद्धीमतेचे सर्व मान्यवरांचे वतीने कौतुक करण्यात आले. संस्थेच्या वतीने नेत्रदान व देहदान, वृक्षसंवर्धनाकरीता अंत्यसंस्कारातील बांबू संकलन, गरजु व्यक्तिंकरीता जुने कपडे २४ तास उपलब्ध असलेली माणुसकीची भिंत यासारखे समाजोपयोगी व अभिनव असेच उपक्रम पुर्वीपासूनच राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाला पत्रकार सतिश वखरे, राजश्री विरुळकर, पयावरण सवर्धन सस्था, वक्ष मित्र परिवार, पतंजली योग समिती, वणा नदी संवर्धन समिती, श्रीमंत योगी लोककल्याण प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,जीवरक्षक फाउंडेशन, आम्ही भारतीय,नारायण सेवा मंडळ, रोटरी क्लब, याशहरातील विविध सामाजिक व पयावरणाच्याक्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांचे सदस्यउपस्थित होते. अँड सुधीर कोठारी व नगर परिषद हिंगणघाटचे वतीने भविष्यात लॉकरघण्यासाठी आथिक सहकाय करण्याच वचनदेण्यात आले.
कळपसरपसहरीं-रीह श्रेलज्ञशीयावेळी प्रत्येक रविवारला स्मशानभूमी स्वच्छकरणारे वसंत पाल, राजा महाराज शेंडे व राशन नागमात याच मान्यवराच हस्त स्वागतकरण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुणवंतठाकरे तर आभार गोपाल मांडवकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठीप्रामुख्याने मोहन कठाने, धनराज कुंभारे, जयंत मानकर,उमेश डेकाटे, आशिष पाल, किरण शिवणकर, तुषार हवाईकर,अशोक पवनीकर, गणेश कुंभारे, रुपेश बाकरे,राहुल बंगाले,रुपेश तुमाने, शंकर पाल, नरेंद्रमानकर, कार्तिक काटकर, योगेश बाकरे, प्रकाश भानुसे, राजु पोगडे, साई रंभाडे, यशतुमाने, मयुर बासनवार, आकाश चेन्नुरवार, संजय कुंभारे, शुभम कुंभारे, शुभम ठाकरे, कार्तिक साधनकर इत्यादी सदस्यांनी विशेष मेहनत केली. कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुककरण्यात आले.