महाराष्ट्र Archives - https://jansangram.com/category/maharashtra/ Tue, 18 Aug 2026 11:10:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://jansangram.com/2026/08/18/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%89%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%89%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a5%89%e0%a4%95-%e0%a4%ab%e0%a5%89%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%89%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a4%ae/ https://jansangram.com/2026/08/18/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%89%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%89%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a5%89%e0%a4%95-%e0%a4%ab%e0%a5%89%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%89%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a4%ae/#respond Tue, 18 Aug 2026 11:10:04 +0000 https://jansangram.com/?p=1229 प्रतिनिधी / दै. जन-संग्राम मुंबई : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात … Read More

The post ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on .

]]>
प्रतिनिधी / दै. जन-संग्राम

मुंबई : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणच्या या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

२१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत युवा पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

या ऐतिहासिक जलसंधारण मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच सोशल मीडियावर उपलब्ध असलेला अधिकृत क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे फडणवीस यांनी सांगितले. जलसंधारण ही केवळ राज्य शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असलेली लोकचळवळ आहे. त्यामुळे या जनजागृती अभियानात प्रत्येкаने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

चला, एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालuya. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मूलमंत्राला जगवूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

The post ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/08/18/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%89%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%89%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a5%89%e0%a4%95-%e0%a4%ab%e0%a5%89%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%89%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a4%ae/feed/ 0
पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत वर्ध्यातील तीनशे वारकऱ्यांना वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार https://jansangram.com/2026/07/14/%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%b8%e0%a4%aa%e0%a4%95/ https://jansangram.com/2026/07/14/%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%b8%e0%a4%aa%e0%a4%95/#respond Tue, 14 Jul 2026 10:00:44 +0000 https://jansangram.com/?p=1195 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाटचाल नव्हे, तर माणुसकी, सेवा, समता आणि प्रेमाचा अखंड उत्सव होय. अनाथांच्या जीवनात मायेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या पद्मश्री डॉ. सी. सिंधुताई … Read More

The post पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत वर्ध्यातील तीनशे वारकऱ्यांना वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम

पुणे : वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाटचाल नव्हे, तर माणुसकी, सेवा, समता आणि प्रेमाचा अखंड उत्सव होय. अनाथांच्या जीवनात मायेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या पद्मश्री डॉ. सी. सिंधुताई सपकाळ यांनी जपलेली हीच मानवतेची परंपरा आजही त्यांच्या संस्थेत तेवढ्याच प्रेमाने आणि आत्मीयतेने जोपासली जात आहे. त्यांच्या जन्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातून संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा-२०२६ निमित्त आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या तब्बल ३०० वैदर्भीय वारकऱ्यांचे सासवडजवळील कुंभारवळण येथील ममता बाल सदन (बालगृह) येथे पारंपरिक वैदर्भीय पुरणपोळीच्या स्वादिष्ट भोजनाने स्वागत करण्यात आले. माईंच्या विचारांची ही सेवा-परंपरा २७ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे.

पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील संस्थेत वारकऱ्यांचा दोन दिवस मुक्काम होता. पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड, ममता सपकाळ, सौ. सुजाता गायकवाड, अधिक्षिका स्मिता पानसरे यांनी अत्यंत आत्मीयतेने वारकऱ्यांचे स्वागत केले. रविवारी (१२ जुलै) वारकऱ्यांसाठी वैदर्भीय परंपरेनुसार पुरणपोळी, चपाती, पातोळीची भाजी, कढी, पालक व कांदा भजी, वरण-भात, सलाद अशा रुचकर भोजनाची व्यवस्था करण्यात आली. रात्री काल्याचे कीर्तन, हरिपाठ आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक सोहळा रंगला. सोमवारी (१३ जुलै) सकाळी आठ वाजता ज्ञानोबा-तुकारामाच्या अखंड जयघोषात ही दिंडी जेजुरीमार्गे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी आश्रमातील मुलींनी पावली, फुगडी आणि अभंगांच्या गजरात वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप दिला. सेवा आणि भक्तीचा संगम अनुभवत अनेक वारकरी भारावून गेले.

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ या मूळच्या वर्धा जिल्ह्यातील, तर त्यांची कर्मभूमी पुणे जिल्हा होती. त्यामुळे आपल्या माहेरच्या भूमीतून येणाऱ्या वारकऱ्यांचा सन्मानपूर्वक पाहुणचार करण्याची परंपरा त्यांनी स्वतः सुरू केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनानंतरही ही सेवा खंडित होऊ न देता, त्यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपकदादा गायकवाड यांनी ती अधिक समर्पित भावनेने पुढे चालविली आहे. माईंच्या संस्कारांचा, सेवाभावाचा आणि माणुसकीचा वारसाचा हा जिवंत अविष्कार म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते.

वर्धा जिल्ह्यातील दिंडी क्रमांक २१७ मधील जवळपास ३०० वारकरी मागील २७ वर्षांपासून संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. यंदाही श्री संत ज्ञानेश्वर माऊली पायदळ वारकरी दिंडी मंडळ, वर्धा यांच्या वतीने दिंडी मालक ह.भ.प. कवडूजी महाराज कठाणे आणि दिंडी चालक लक्ष्मण महाराज तराळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. शनिवारी (११ जुलै) दुपारी ही दिंडी ममता बाल सदनात दाखल झाली. संस्थेच्या वतीने दिंडी मालक ह.भ.प. कवडूजी महाराज कठाणे यांचा सपत्नीक वस्त्र, साडी-चोळीने गौरव करण्यात आला. यावेळी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड, सौ. सुजाता गायकवाड, अधिक्षिका स्मिता पानसरे संस्थेचे संचालक गोपाल गायकवाड, प्रसन्न गायकवाड, संजय गायकवाड, पवन गायकवाड तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडीमध्ये ह.भ.प. शुभम महाराज फुलभोगे, ह.भ.प. गौरव महाराज ठाकरे, ह.भ.प. अक्षय महाराज हरणे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज खंडाते, ह.भ.प. प्रवीण महाराज मोहिजे, ह.भ.प. संजय महाराज ठाकरे, दिंडीचे विणेकरी ह.भ.प. बाबारावजी महाराज निर्मळ ह.भ.प. प्रवीण महाराज मोहिते, ह.भ.प. रामकृष्ण महाराज टेकाळे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज खंडाते यांच्यासह तीनशे वारकरी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ममता बाल सदन संस्थेच्या मुलींनी कर्मचाऱ्यांनी आश्रमातील मुली, कर्मचारी आणि सेवक परिश्रम घेतले.

The post पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत वर्ध्यातील तीनशे वारकऱ्यांना वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/07/14/%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%b8%e0%a4%aa%e0%a4%95/feed/ 0
राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा; यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://jansangram.com/2026/06/25/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a5%ad%e0%a5%ab-%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b1/ https://jansangram.com/2026/06/25/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a5%ad%e0%a5%ab-%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b1/#respond Thu, 25 Jun 2026 12:02:01 +0000 https://jansangram.com/?p=1178 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित … Read More

The post राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा; यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम
मुंबई : राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांनाही यावर्षाअखेरीस दिवसा वीजपुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य सदाभाऊ खोत यांनी प्रश्न उपस्थित केला, तर सदस्य बच्चू कडू, प्रविण दरेकर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मे महिन्यात काही वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये एकाच वेळी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अल्पकाळासाठी भारनियमन करावे लागले होते. मात्र सध्या राज्यात कोणतेही भारनियमन करण्यात येत नाही. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या सौर कृषी पंप योजनेंतर्गत विविध भौगोलिक परिस्थितींना अनुरूप मॉडेल्स विकसित करण्यात आली आहेत. नदीकाठ, पूररेषा, कालवे तसेच खोल जलस्त्रोतांमधून पाणी उपसा करण्यासाठी मोनोपोल, बस्टर पंप आणि तरंगत्या सौर पंपांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षात राज्यात १० लाखांहून अधिक सौर पंप बसविण्यात आले असून शेतकऱ्यांकडून योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या आरडीएसएस योजनेंतर्गत राज्यात सुमारे २५ हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये फीडर विभक्तीकरण, नवीन उपकेंद्रे, अतिरिक्त रोहिते (डीपी) आणि वितरण यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. पुढील तीन वर्षात या कामांमुळे डीपी निकामी होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डार्क झोन भागातील शेतकऱ्यांनाही दिलासा देण्यासाठी खोल जलस्तर असलेल्या भागामध्ये अधिक क्षमतेचे पंप, बस्टर पंप आणि त्यावर अनुदान देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच सौर पंपाधारकांना वीज बिलाचा कोणताही प्रश्न राहत नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर २०३१-३२ पर्यंत ७८ हजार मेगावॉट वीज क्षमता उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या क्षमतेचे प्रभावी वहन सुनिश्चित करण्यासाठी ट्रान्समिशन कॉरिडॉर उभारणीवर विशेष भर देण्यात येत असून टीबीसीबी पद्धतीद्वारे १६ हजार कोटी रुपयांची कामे सुरू झाली आहेत. पुढील तीन वर्षात ट्रान्समिशन क्षेत्रात सुमारे ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. मुंबईच्या वीज सुरक्षेसाठी ‘मुंबई आयलँडिंग’ संकल्पनेअंतर्गत महत्त्वाचे ट्रान्समिशन कॉरिडॉर पूर्ण करण्यात आले असून आता मुंबईत अतिरिक्त ३ हजार मेगावॉट वीज आणण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मुंबईचा वीजपुरवठा अबाधित ठेवणे शक्य होणार आहे.

पीएम सूर्य घर योजनेंतर्गत रूफटॉप सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर पोहोचला असून गृहसंकुलांनी मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा स्वीकारल्यास त्यांच्या सामाईक वीज खर्चात मोठी बचत होऊ शकते, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

The post राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा; यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/06/25/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a5%ad%e0%a5%ab-%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b1/feed/ 0
कोळसा वायूकरणामुळे भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल; विदर्भाला गॅसिफिकेशन हब बनविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://jansangram.com/2026/06/21/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4/ https://jansangram.com/2026/06/21/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4/#respond Sun, 21 Jun 2026 07:06:39 +0000 https://jansangram.com/?p=1156 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा परिवर्तनाचा निणायक टप्पा आह. कद्र शासनाच्या धोरणांना पूरक अशी राज्याची धोरणे राबवून … Read More

The post कोळसा वायूकरणामुळे भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल; विदर्भाला गॅसिफिकेशन हब बनविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा परिवर्तनाचा निणायक टप्पा आह. कद्र शासनाच्या धोरणांना पूरक अशी राज्याची धोरणे राबवून विदर्भाला कोळसा वायूकरण आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या उत्पादनांचे प्रमुख केंद्र बनविण्याचा राज्य शासनाचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल ताज लँडस एन्ड, बांद्रा यथे कद्रीय काळसा मत्रालयान आयोजित केलेल्या “सरफेस कोल / लिग्नाइट गॅसिफिकेशन प्रमोशन रोड शो” या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय खनिकर्म राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे, केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सचिव विक्रम देव दत्त, अतिरिक्त सचिव भूपिंदर ब्रार, सरोज कुमार झा तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, गुंतवणूकदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोळसा वायूकरणाचा इतिहास मुंबईशी जोडलेला आहे. १८६२ मध्ये बॉम्बे गॅस कंपनीने परळ येथे कोळसा वायूकरण प्रकल्प सुरू केला होता. त्यामुळे या क्षेत्रातील देशाचा ऐतिहासिक वारसा मुंबईकडे असून, आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भारत पुन्हा या क्षेत्रात माठी झेप घइल. प्रधानमत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या “आत्मनिर्भर भारत” आणि “विकसित भारत” या संकल्पना साकार करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातील स्वावलबन अत्यावश्यक आहे. आजही देशाला तेल, वायू आणि इतर ऊर्जा स्रोतांच्या आयातीवरदरवर्षी मोठा निधी खर्च करावा लागतो. त्यामुळे परकीय चलनावर ताण येतो, महागाई वाढते आणि जागतिक घडामोडींचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी स्वच्छ व स्वदशी ऊर्जा निमितीला चालना दण गरजेचे आहे. भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले असून, देशाने आधीच २८३ गिगावॅट क्षमतेचा टप्पा पार केला आहे. सौर, पवन आणि हरित हायड्रोजनबरोबरच कोळसा वायूकरणही ऊर्जा सुरक्षेचा महत्त्वाचा आधार ठरणार आहे.

भारताकडे सुमारे ४०० अब्ज टन कोळशाचा साठा आहे. या कोळशापासून इथेनॉल, मिथेनॉल, युरिया, विविध रसायने आणि कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज तंत्रज्ञानाद्वारे पर्यावरणपूरक औद्योगिक विकासाला चालना देता येईल. त्यामुळे प्रदूषणात घट होऊन उद्योग क्षेत्र अधिक शाश्वत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. कोळसा वायूकरण उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने हजारो कोटी रुपयांचे प्रोत्साहन जाहीर केले आहे. महाराष्ट्र शासनानेही त्याला पूरक धोरण जाहीर केले असून, भांडवली अनुदानासह विविध सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत.

विदर्भातील कोळशाचे साठे आणि विकसित होत असलेली स्टील उद्योग साखळी लक्षात घेता महाराष्ट्र हे देशातील ग्रीन स्टील आणि कोळसा वायूकरण उद्योगाचे प्रमुख केंद्र बनू शकतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बीपीसीएल, कोल इंडिया, न्यू एरा क्लीनटेक, क्रेटा एनर्जी, अदानी समूहासह अनेक कंपन्यांनी राज्यात या क्षेत्रात गुंतवणुकीला सुरुवात केली असल्याची माहिती देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाल की, प्रकल्पासाठी दोन हजार एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून, “मैत्री’ पोर्टलद्वारे सर्व परवानग्या निश्चित कालमर्यादेत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर पुढे यावे, असे आवाहन करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांमुळे कोळसा वायूकरण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. विदर्भाला या उद्योगाचे राष्ट्रीय केंद्र बनवून महाराष्ट्र देशाच्या औद्योगिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल,.कोळशाला केवळ कोळसा समजू नका; योग्य तंत्रज्ञान आणि योग्य वेळ मिळाल्यास तोही कोहिनूर ठरू शकतो, असे सांगत विकसित भारताच्या निर्मितीत काळसा वायूकरणाची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) हे भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांचे पुढील महत्त्वाचे पर्व असून, ऊर्जा सुरक्षा, आर्थिक सरक्षा, औद्यागिक प्रगती आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी ते निर्णायक ठरणार असल्याचे केंद्रीय काळसा व खनिकम मत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.

The post कोळसा वायूकरणामुळे भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल; विदर्भाला गॅसिफिकेशन हब बनविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/06/21/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4/feed/ 0
म्हाडा नागपूर मंडळातील प्रकल्प तातडीने मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर https://jansangram.com/2026/06/21/%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa/ https://jansangram.com/2026/06/21/%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa/#respond Sun, 21 Jun 2026 07:02:47 +0000 https://jansangram.com/?p=1153 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई: म्हाडा नागपूर मंडळांतर्गत सुरू असलेले विविध विकास प्रकल्प आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. त्यांच्या … Read More

The post म्हाडा नागपूर मंडळातील प्रकल्प तातडीने मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम
मुंबई: म्हाडा नागपूर मंडळांतर्गत सुरू असलेले विविध विकास प्रकल्प आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत नागपूर मंडळातील विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस म्हाडा प्राधिकरणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागपूर मंडळातील रिक्त पदांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला; तसेच चंद्रपूर येथील सार्वजनिक उद्यान प्रकल्पासाठी ईओआय प्रक्रिया, हायर परचेस योजनेअंतर्गत व्याजाच्या रक्कमेसाठी राबविण्यात येणारी अभय योजना, नवीन चंद्रपूर येथील सिमेंट काँक्रीट रस्ते विकास कामे, चंद्रपूर; तसेच वर्धा येथील वृद्धाश्रम प्रकल्प आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी संबंधित प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावीत, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रलंबित विषयांचा त्वरित निपटारा करून विकासकामांना गती देण्याबरोबरच प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देशही डॉ. भोयर यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले.

The post म्हाडा नागपूर मंडळातील प्रकल्प तातडीने मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/06/21/%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa/feed/ 0
विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत न्यायालयाचा नवा आदेश, शिक्षण विभागाला वेळापत्रकात बदल करण्याची वेळ https://jansangram.com/2026/06/11/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3/ https://jansangram.com/2026/06/11/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3/#respond Thu, 11 Jun 2026 05:28:14 +0000 https://jansangram.com/?p=1129 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुणे : राज्याच्या शिक्षण विभागाने विदर्भातील तापमानाचा विचार करून विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, आता या निर्णयातही बदल करावा लागणार असून, न्यायालयाच्या आदेशानुसार विदर्भातील … Read More

The post विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत न्यायालयाचा नवा आदेश, शिक्षण विभागाला वेळापत्रकात बदल करण्याची वेळ appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम
पुणे : राज्याच्या शिक्षण विभागाने विदर्भातील तापमानाचा विचार करून विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, आता या निर्णयातही बदल करावा लागणार असून, न्यायालयाच्या आदेशानुसार विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू कराव्या लागणार आहेत.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने १५ जूनपासून विदर्भातील शाळा सुरू करण्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या बाबत समितीचे राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज बुधवार न्या. अनिल किल्लोर, न्या. राजेश वाकोडे यांच्यासमोर सुनावणी झाली.

शिक्षण संचालनालयाने ९ जून रोजी २२ जूनपासून विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत प्रसिद्ध केलेले परिपत्रक न्यायालयात सादर करून त्याप्रमाणे आदेश देण्याची विनंती केली. मात्र, याचिकाकर्ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने ड. डॉ. बी. जी. कुलकर्णी यांनी शासनाच्या भूमिकेस विरोध केला.

खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून शासनाच्या भूमिकेवर असहमती दर्शवून विदर्भातील शाळा १५ जून आणि २२ जूनपासून सुरू करण्याचा शिक्षण संचालकांचा आदेश रद्द करण्याचा निर्णय दिला. तसेच २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयाप्रमाणे शाळा सुरू करण्याबाबत आदेश दिले. त्यामुळे आता विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू कराव्या लागणार आहेत.

दरम्यान, न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार ३० जूनपासून शाळा सुरू करण्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले.

The post विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत न्यायालयाचा नवा आदेश, शिक्षण विभागाला वेळापत्रकात बदल करण्याची वेळ appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/06/11/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3/feed/ 0
३६,५८५ कोटींची कर्जमाफी, ५६ लाख शेतकऱ्यांना फायदा; तरीही सरकारने मोठी घोषणा का केली नाही? https://jansangram.com/2026/06/03/%e0%a5%a9%e0%a5%ac%e0%a5%ab%e0%a5%ae%e0%a5%ab-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80-%e0%a5%ab/ https://jansangram.com/2026/06/03/%e0%a5%a9%e0%a5%ac%e0%a5%ab%e0%a5%ae%e0%a5%ab-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80-%e0%a5%ab/#respond Wed, 03 Jun 2026 11:35:40 +0000 https://jansangram.com/?p=1125 प्रतिनिधी/दै.जन-संग्राममुंबई : महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ऐतिहासिक कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटींची कर्जमाफी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना असं या कर्जमाफीला नाव … Read More

The post ३६,५८५ कोटींची कर्जमाफी, ५६ लाख शेतकऱ्यांना फायदा; तरीही सरकारने मोठी घोषणा का केली नाही? appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राममुंबई : महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ऐतिहासिक कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटींची कर्जमाफी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना असं या कर्जमाफीला नाव देण्यात आले असून यातून ५६ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ मान्यता मिळाल्यानंतरही सरकारकडून इतक्या मोठ्या निर्णयाची अधिकृतपणे घोषणा का करण्यात आली नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु यामागे राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे लागलेली आचारसंहिता हे कारण आहे. परंतु दुसरीकडे सरकारचा हा तर्क शेतकरी नेत्यांनी खोटा असल्याचे सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी यावर आक्षेप घेतला. अजित नवले म्हणाले की, कर्जमाफीची घोषणा आधीच झाली होती त्यामुळे आचारसंहितेचे कारण देऊन माहिती देण्यापासून सरकार दूर जातंय का अशी शंका यातून उपस्थित होते. कर्जमाफी कुणाला करण्यात आली, याबाबत काय अटी आहेत, किती लाखांची कर्जमाफी झाली. २ लाखांहून अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे वन टाईम सेटलमेंट लागू होणार की नाही असे विविध प्रश्न उपस्थित होत आहे. ३० जून २०२६ च्या आत प्रत्यक्ष कर्जमाफीचे हप्ते बँकांमध्ये जमा झाले नाहीत तर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देणे अवघड होणार आहे. त्यामुळे खूप कमी काळ शिल्लक आहे. त्या परिस्थितीत माहिती दडवणे, अपारदर्शकता ठेवणे हे वाईट ठरू शकते. त्यामुळे सरकारने या कर्जमाफीची माहिती खुली करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

तर निवडणूक आयोग आणि आचारसंहितेचे बहाणा कपोलकल्पित आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतील मतदार थेटपणे या कर्जमाफीचे लाभार्थी नाहीत. सरकार बँक आणि प्रशासकीय स्तरावरील आपली ढिसाळ तयारी लपवण्यासाठी आचारसंहितेचा आधार घेत आहे. कर्जमाफीची घोषणा बजेटमध्ये यापूर्वी झाली होती त्यामुळे आचारसंहितेचे तांत्रिक कारण असू शकत नाही असं सांगत राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला.

The post ३६,५८५ कोटींची कर्जमाफी, ५६ लाख शेतकऱ्यांना फायदा; तरीही सरकारने मोठी घोषणा का केली नाही? appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/06/03/%e0%a5%a9%e0%a5%ac%e0%a5%ab%e0%a5%ae%e0%a5%ab-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80-%e0%a5%ab/feed/ 0
“प्रहार’ करता करता बच्चू कडूंच्या हाती “शिवबंधन’; विधान परिषदेसाठी उमेदवारी https://jansangram.com/2026/05/01/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a4%a1/ https://jansangram.com/2026/05/01/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a4%a1/#respond Fri, 01 May 2026 05:46:41 +0000 https://jansangram.com/?p=1079 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी पन्हा एकदा तीव झाल्या आहत. “प्रहार जनशक्ती पक्षा’चे प्रभावशाली नेते आणि प्रमुख बच्चू कडू यांनी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटात प्रवेश केला आहे. … Read More

The post “प्रहार’ करता करता बच्चू कडूंच्या हाती “शिवबंधन’; विधान परिषदेसाठी उमेदवारी appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी पन्हा एकदा तीव झाल्या आहत. “प्रहार जनशक्ती पक्षा’चे प्रभावशाली नेते आणि प्रमुख बच्चू कडू यांनी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटात प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश करताच, शिवसेनेने त्यांना विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमदवार म्हणन घाषित कल. ही नवीनजबाबदारी स्वीकारल्यानंतर, बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भविष्यातील उद्दिष्टे आणि विचारसरणी स्पष्ट केली.

“प्रहार’ संघटनेचे संस्थापक असलेल्या बच्चू कडू यांनी, हाती भगवा ध्वज घेऊन आज जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले आणि त्यानंतर त्यांनी चङउ निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, या प्रसंगी त्यांनी हे स्पष्ट केले की, “प्रहार’ ही संघटना एक स्वतंत्र संघटना म्हणूनच कार्यरत राहील. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव संजय मोरे, आमदार मुरजी पटेल आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते(शिवसैनिक) आणि खुद्द बच्चू कडू उपस्थित होते.

बच्चू कडू हे त्यांच्या आक्रमक कार्यशैलीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कलल्या अथक सघषासाठओळखले जातात. ते म्हणाले,शेतकरी आणि सर्वसामान्य जनताहेच माझे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. विधिमंडळात प्रवेशकरण्यामागील माझे मुख्य उद्दिष्टहच आह की, समाजातील यावंचित घटकांचा आवाज अधिकजोमाने मांडणे. आम्ही सरकारच्या धोरणांना थेट सर्वसामान्य माणसाच्यादारापर्यंत पोहोचवू. आपल्या राजकीयविचारसरणीबद्दल बोलताना, कडूयांनी ठामपणे सांगितले की ते आपल्याकायाला काणत्याही सकचित कक्षत मर्यादित ठेवणार नाहीत. त्यांनी स्पष्टकेले की, प्रभू श्रीराम, डॉ. बाबासाहेबआंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजआणि पुण्यश्लोक अहिल्याबाईहोळकर यांच्या विचारसरणीचा प्रसारकरण्यासाठी ते जनतेच्या प्रत्येकघटकापर्यंत पोहोचतील आणि स्वतः ला पूर्णपणे वाहून घेतील.

या महान ऐतिहासिक विभूतींनी दाखवून दिलेल्यामार्गाचे अनुसरण करूनच महाराष्ट्राचासर्वांगीण विकास शक्य आहे, असा ठाम दावा त्यांनी केला. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहेकी, बच्चू कडू हे यापूर्वी “महाविकासआघाडी’चा एक घटक होते. मात्र, २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्याबंडखोरीदरम्यान, त्यांनी शिंदे यांना ठामपणे पाठिंबा दिला हाता. एकनाथशिंदे यांच्या नेतृत्वाखालील “महायुती’सरकारमध्ये बच्चू कडू यांच्यावर”दिव्यांग कल्याण मंत्रालया’चेप्रमुखपद सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनाकॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त होता. आता, शेतकरी कर्जमाफी आणिइतर संबंधित मुद्द्यांवर बच्चू कडूआपल्याच सरकारविरुद्ध आवाजउठवू शकतील की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

The post “प्रहार’ करता करता बच्चू कडूंच्या हाती “शिवबंधन’; विधान परिषदेसाठी उमेदवारी appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/05/01/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a4%a1/feed/ 0
“महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://jansangram.com/2026/04/28/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0-%e0%a4%8f%e0%a4%86%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a5%85%e0%a4%9f%e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%9f%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%95/ https://jansangram.com/2026/04/28/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0-%e0%a4%8f%e0%a4%86%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a5%85%e0%a4%9f%e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%9f%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%95/#respond Tue, 28 Apr 2026 04:56:45 +0000 https://jansangram.com/?p=1052 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्धकरून देणारा “महाचतुर एआय चॅटबॉट’हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित … Read More

The post “महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्धकरून देणारा “महाचतुर एआय चॅटबॉट’हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉटदेशातील राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रमआह. या चटबाटमळ यवा वगाचा शिक्षणते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईलआणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरितउपलब्ध होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, राजगार, उद्याजकता व नाविन्यता विभागाच्या “चॅटबॅाट’ लोकार्पण वसामंजस्य करार पार पडले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता वनाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्तडॉ.अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, जपानचे वाणिज्यदूत हितोमि साटो, जर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्टोफ हेलिअर, कोरियाचे वाणिज्य दूत यो डाँवॉन, फिनलँडचे वाणिज्य दूत इरिक एफ हॉलस्ट्रॉम तसेच विविध उद्योग व शक्षणिक सस्थाच प्रतिनिधी, आतरराष्टीय भागीदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,भारताची ६५ टक्के लोकसंख्या ३५वर्षांखालील असून ही डेमोग्राफिकॲडव्हांटेज देशाच्या विकासासाठीमोठी संधी आहे. या युवा शक्तीलाकौशल्य प्रशिक्षण देऊन अर्थव्यवस्थेच्यामुख्य प्रवाहात आणणे आवश्यकअसून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रातही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग प्रभावीपणे काम करत असून उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे आणि तरुणांना रोजगार हवा आहे. या दोघांमध्ये प्रभावी दुवा निर्माण करण्याचे काम “महाचतर चटबाट’ करणार आह. एआय आधारित “चॅटबॉट’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, उद्योजकता मार्गदर्शन, अर्ज प्रक्रिया, असेसमेंट आणि मार्केट लिंकेज अशा सर्व सेवा वन-स्टॉप सोल्युशन म्हणून उपलब्ध करून देणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विशेषतः रोजगाराभिमुख युवकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी हा चटबॉट उपयुक्त ठरणार असून व्हॉट्सपच्या माध्यमातून तो सर्वांसाठी सहज उपलब्ध असल्याने त्याचा माठ्या प्रमाणात लाभ हाइल, सटर आफ एक्सलन्स, आयटीआय आधुनिकीकरण, महिलांचा कौशल्य उपक्रमात सहभाग वाढविणे, तसेच विविध भागीदारींमुळे कौशल्य क्षेत्राला बळ मिळणार आहे. महाराष्ट्राची अथव्यवस्था जगातील तिसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून आगामी काळात अधिक मोठी झेप घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाची भमिका अत्यत महत्वाची आह. महाचतर हे नाव जितके सुंदर तितकाच हा उपक्रम दूरदृष्टीचा असून महाराष्ट्राला कौशल्य, रोजगार आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

The post “महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/04/28/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0-%e0%a4%8f%e0%a4%86%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a5%85%e0%a4%9f%e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%9f%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%95/feed/ 0
सावधान…! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती https://jansangram.com/2026/04/16/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%89%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b8/ https://jansangram.com/2026/04/16/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%89%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b8/#respond Thu, 16 Apr 2026 04:53:00 +0000 https://jansangram.com/?p=1033 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा विपरीत परिणाम म्हणून पुढील काही दिवस राज्यातील काही भागांना देण्यात आलेला उष्णतेचा इशारा कायम राहणार आहे. मंगळवारी अकोला येथे देशात … Read More

The post सावधान…! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती appeared first on .

]]>
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा विपरीत परिणाम म्हणून पुढील काही दिवस राज्यातील काही भागांना देण्यात आलेला उष्णतेचा इशारा कायम राहणार आहे. मंगळवारी अकोला येथे देशात सर्वाधिक तापमान म्हणून ४४ अंश सेल्सिअसची नोंद झाली असतानाच बुधवारी देखील विदर्भ आणि राज्यातील अनेक भागात कमाल तापमान चाळीस अंशांवर नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मुंबई महानगर प्रदेशात देखील उष्णता अधिक राहील, असे देखील हवामान अभ्यासाकांकडून सांगण्यात आले.

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कमाल तापमान पढील एक आठवडा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्टाच्या अतगत भागातील काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थितीची शक्यता आहे. विदर्भात (४२+), मराठवाडा, मध्य महाराष्ट्र (३८-४०), कोकण प्रदेशात उष्ण दमट (३४-३६) तापमान राहील. गल्या काही दिवसांपासून म्हणजे विशेषतः एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात कमाल तापमान सरासरी होते. परंतु आता उष्णतेमध्ये वाढ झाल्याने तापमान अधिक वाढल्याने नागरिकांना मोठ्या कमाल तापमानाचा सामना करावा लागत आहे. हवामान अभ्यासाक अथ्रेय शेट्टी यांच्याकडील माहिती नुसार, मुंबई महानगर प्रदेशात शुक्रवारपर्यंत उष्णतेच्या लाटे सदृश्य स्थिती राहील. मुंबईचे कमाल तापमान ३५ आणि ३६ अंशांच्या आसपास नोंदविले जात असून हवामानातील बदलामुळे मुंबईकरांना अधिक अधिक ताप सहन करावा लागेल.

The post सावधान…! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती appeared first on .

]]>
https://jansangram.com/2026/04/16/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%89%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b8/feed/ 0