माध्यमात येणाऱ्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारीची दखल घ्या- निवडणूक निरीक्षक
वर्धा/प्रतिनिधी निवडणूक काळात आचार संहितेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी एमसीएमसी समितीने व सायबर सेलने उमेदवारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नियमित लक्ष ठेवून योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार सघासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती व मीडिया कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीत करण्यात आली आहे. या कक्षाला निवडणक निरीक्षक (सामान्य) जयप्रकाश सिंग व विनय बुबलानी आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) केथन आर. यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी एमसीसीचे नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) चे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, एमसीएमसीचे सदस्य तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक सुमंतराज भुजबळ, जनसंपर्क अधिकारी बुध्ददास मिरगे, जिल्हा कार्यकारी अधिकारी (एमव्हीएसटीएफ) प्रवीण कुऱ्हे यांच्यासह संबंधीत अधिकारी उपस्थित होते. यावेळी निवडणूक निरीक्षकांनी एमएसीएमसी समितीच्या कार्यालयाच संपूर्ण निरीक्षण केले. कार्यालयातील प्रत्येक शाखेची सविस्तर माहिती जाणून घेऊन समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी निवडणूक निरीक्षकांनी माध्यम प्रमाणिकरण व सनियत्रण समिती (एमसीएमसी), माध्यम कक्ष, साशल मीडिया व सायबर सलच्या कायाची माहिती घतली.
आचार संहितेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी समितीच्या कक्षात लावण्यात आलेल्या टिव्हीद्वारे विविध चॅनेल्सवर येणाऱ्या घडामोडीं व माहितीचे समितीची चमू नियमित निरीक्षण करत आहे. या माहिती मध्ये काही आक्षेपार्ह असल्यास वरिष्ठांना तात्काळ अवगत करण्याच्या सूचना निरीक्षकांनी केल्या. तसेच विधानसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांचे सोशल मीडिया अकाऊंटची नियमित तपासणी सायबर सेलने करून वेळोवेळी माहिती द्यावी, असे ते म्हणाले. उमेदवारांकडून प्रमाणिकरणासाठी सादर करण्यात यणा-या विविध परवानग्यासाठीचे अर्ज समिती मार्फत वेळेच्या आत निकाली काढण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. प्रमाणित न केलेल्या जाहिरातींवर आचार संहितेचे उल्लंघन या अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.