राजकीय पक्ष व उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करावे- जय प्रकाश सिंग
वर्धा/प्रतिनिधी निष्पक्ष व मुक्त वातावरणात निवडणूक होण्यासाठी सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निरीक्षक जय प्रकाश सिंग यांनी केले. सोमवार ४ नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणुक निरीक्षक जय प्रकाश सिंह यांचे उपस्थित ४४- आर्वी विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची बैठकपार पडली त्यावेळी ते बोलतहोते. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघनझाल्यास सिव्हिजिलचा वापर करूनआपल्या तक्रारी आपण नोंदवूशकता असे त्यांनी सांगितले.
सदर बैठकीमध्ये निवडणूकनिर्णय अधिकारी विश्वासशिरसाट यांनी उमेदवारांनाआदर्श आचारसंहितेचे पालन करतांना काय करावे व काय करू नये, प्रचारासाठी आवश्यक परवानगी व त्या मिळवण्यासाठी एक खिडकीबाबत तसेच भारत निवडणूक आयोग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या सुविधा पोर्टल व सुविधा ॲप बद्दल माहिती दिली. निष्पक्ष व मुक्त वातावरणात निवडणूक होण्यासाठी सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निरीक्षक जय प्रकाश सिंग यांनी केले. यावळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी हरीष काळे तहसिलदार आर्वी, श्रीमती हंसा मोहणे तहसिलदार आष्टी व श्रीमती ऐश्वर्या गिरी तहसिलदार कारंजा घा. तसेच उमेदवार व उमेदवराचे प्रतिनिधी हजर होते.