विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज्ा; ४ हजार १४० अंतिम उमेदवार- मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
मुंबई/प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी राज्यातील एकूण२८८ विधानसभा मतदारसंघासाठी एका टप्प्यांमध्ये दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदानघेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असून या निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची संख्या४ हजार १४० असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी आज दिली. मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्यापत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते.
यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूकअधिकारी पी.प्रदीप उपस्थित होते. श्री.चोक्कलिंगम यांनी सांगितले की, राज्यातील लोकसभेच्या १६ – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा दिनांक२० नोव्हेंबर, २०२४ रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातील विधानसभासार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नामनिर्दे शनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक २९ऑक्टोबर २०२४ असा होता. त्यानुसार २८८ विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ७,०७८ इतके नामनिर्देशन पत्र दाखलकरण्यात आले. त्यापैकी एकूण २,९३८ अर्ज मागे घेण्यात आले.