महाराष्ट्राला मिळाले नवे पोलीस महासंचालक

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्रातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांना पोलीस महासंचालक बनवण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रश्मी शुल्का यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर ही जागा रिक्त होती. आगामी विधानसभा निवडणुकींर्च्या पार्श्वभूमीवर डीजीपी हे पद अत्यंत महत्वाचे आहे. सजय वर्मा ह १९९० बचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या कायदा आणि तंत्रज्ञानचे डीजी म्हणून कार्यरत आहेत. संजय वर्मा एप्रिल २०२८ मध्ये पोलीस सेवेतून निवृत्त होतील. आयपीएस संजय कुमार वर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांनी बीए मॅकेनिकलचे शिक्षण घेतले आहे. संजय कुमार वर्मा यांचा जन्म २३ एप्रिल १९६८ रोजी झाला.