उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
उत्तराखंड/प्रतिनिधी उत्तराखंड येथील अल्मोडा दरीत प्रवासी बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू झाला. अछख या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. बस कोसळताच या ठिकाणी मदत आणि बचावकार्य करण्यासाठी तीन पथकं दाखल झाली. एसडीआरएफतर्फे हे बचावकार्य राबवण्यात येतं आहे. आत्तापर्यंत या अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला. तसंच इतर लोक जखमी झाले आहेत. अपघातात जे लोक जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे अशी माहिती एसडीएम संजय कुमार यांनी दिली. अछख च्या वत्तानसार ज्या बसचा अपघात झाला त्या बसमध्ये ४५ जण बसले होते. बसचा अपघात झाल्यानंतर तातडीने तिथे एसडीआरएफचं पथक पोहचलं. या दुर्घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पष्कर सिंह धामी यानी शाक व्यक्त केला.तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.