बहार, वनविभाग व बोर व्याघ्र प्रकल्पाचे आयोजन आजपासून पक्षी सप्ताहानिमित्त विविध उपक्रम
वर्धा/प्रतिनिधी राज्यभर सर्वत्र ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी साप्ताह साजरा केला जात असून या निमित्ताने जिल्ह्यात बहार नेचर फाऊंडेशन, वन विभाग आणि बोर व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारच्या अधिवासात पक्षी निरीक्षण तसेच पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. पक्षी सप्ताहाचे उद्घाटन स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय परिसरात मंगळवार, दि. ५ नोव्हबरला सकाळी ९ वाजता होणार आह. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीतीन रहमान, उपवन संरक्षक हरवीर सिंह यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सप्ताहानिमित्त सलग ८ दिवस दररोज सकाळी ६.३० ते ९ या दरम्यान पक्षी निरीक्षण करण्यात येणार आहे. यात मंगळवारी सकाळी स्थानिक वनविभाग नर्सरी, बुधवारी उमरी मेघे येथील माळरान, गुरुवारी पवनार येथील धाम नदी परिसर, शुक्रवारी दिग्रस तलाव, शनिवारी सावंगी मेघे येथील तलाव, रविवारी ढगा वनक्षेत्रतर सोमवारी पिपरी येथील करुणाश्रम परिसर येथे पक्षी निरीक्षण करण्यात येईल.
या दरम्यान रविवार, दि. १० रोजी दुपारी १ वाजता देवळी तालुक्यातील चिखली येथे मिशन समृद्धी बाल पंचायत अंतर्गत पक्ष्यांबाबत जाणीव जागृती शिबीरआयोजित करण्यात आले आहे. याशिवाय, विविध ठिकाणी पक्षिचित्र प्रदर्शनीही लावण्यात येणार आहे. या उपक्रमाचा समारोप मंगळवार, दि. १२ रोजी सकाळी ९ वाजता बोर व्याघ्र प्रकल्प परिसरात होणार आहे. या उपक्रमात निसर्गप्रेमी नागरिकांनी वविद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बहारचअध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे, मानद वन्यजीव रक्षक तथा उपाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, दीपक गुढेकर, सचिव जयंत सबाने, कोषाध्यक्ष राजदीप राठोड, सहसचिव देवर्षी बोबडे, प्रा. किशोर वानखडे, अतुल शर्मा डॉ. आरती प्रांजळेघुस, पराग दाडग, घनश्याम माहोर, पवन दरण,दर्शन दुधाने यांनी केले आहे