आचार संहितासंबधी तक्रारींचे तात्काळ निराकरण करा- निवडणूक निरीक्षक

वर्धा/प्रतिनिधी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातून प्राप्त झालेल्या आचार संहितेसंबंधी तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश निवडणक निरीक्षक (सामान्य) जय प्रकाश सिंग व विनय बुबलानी यांनी आज दिले. आदर्श आचारसंहिता (एमसीसी), सायबर सुरक्षा व तंत्रज्ञान, माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी), मिडीया सेंटर यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत एमसीसीचे नोडल अधिकारी तथा मख्य कायकारी अधिकारी जितीन रहमान, माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) चे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, एमसीएमसीचे सदस्य तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, माहिती व तंत्रज्ञान व सायबर सुरक्षा (एनआयसी)चे नोडल अधिकारी नितीन चौधरी, सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक सुमंतराज भुजबळ, जनसंपर्क अधिकारी बुध्ददास मिरगे यांच्यासह हिंगणघाट व वर्धा विधानसभेचे नोडल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिकांनी आचार संहितेच्या भंगा संबंधीत तक्रारी सीव्हीजील ॲप किंवा नियंत्रण कक्षाकडे १९५० या क्रमांकावर करण्याचे आवाहन करूननिवडणूक निरीक्षक सिंग व बुबलानी यांनीअधिका-याना सुचना दिल्या की, सबंधीततक्रारींची तात्काळ दखल घेऊन भरारी पथकालातात्काळ शहानिशा करण्यासाठी पाठविण्यात याव.

सदर तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी अधिका-यांनी दक्ष राहून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. स्टार प्रचारक व उमेदवारांच्या जाहीर सभांचेतसेच रॅली व भाषणांचे ध्वनीमुद्रण नियमित करण्यात यावे. त्यात काही आक्षेपार्ह किंवा निवडणूक आचार संहितेचा भंग होत असल्यासतात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाहीकरावी, तसेच उमेदवारांचे सोशल मिडीयाअकाऊंटचे नियमित निरीक्षण सायबर सेलमार्फत करण्यात यावे, प्रिंट माध्यमात येणा-या आचार संहिता भंगाच्या बातम्या, पेड न्यूज व राजकीय जाहिरातींचे सनियंत्रण करण्यात यावे. अशा विविध सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उमेदवारांकडून इलेक्ट्रॉनिक्स मिडीयात तसेचचित्ररथ व अन्य माध्यमाद्वारे करण्यात येणा-या प्रचार जाहिरातीचे एमसीएमसी समितीकडून पुर्वप्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. प्रमाणितन केलेल्या जाहिरातींवर आचार संहितेंचे उल्लंघनया अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.