महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, जागावाटपाबाबत महायुतीतील पक्षांमध्ये सातत्याने बैठका सरू आहत. गरुवारी(दि. २४) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीची मोठी बैठक झाली.
या बैठकीत वाद असणाऱ्या जागांवर निर्णय होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत अमित शाहांनी महायुतीतील बंडखोरांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अमित शांहासोबत बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येतोय की, अमित शाहांची नजर महायुतीच्या बंडखोरांवर आहे. महायुतीच्या कुठल्याही पक्षाचे बंडखोर उभे राहणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मतविभाजन टाळण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकजुटीने निवडणुका लढवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले