देवळीत फटाके फुटले, पेढे वाटले
देवळी/प्रतिनिधी देवळी विधानसभा मतदार संघ परंपरागत भाजपाकडे होता. परंतु, गेल्यावेळी तो महायुतीत शिवसेनेकडे गेला होता.
यावेळीही शिवसेनेकडे मतदार संघ जाणार असल्याची चर्चा होत असताना आज भाजपाने पहिल्या यादीत देवळी विधानसभेची उमेदवारी राजेश बकाने यांना दिली. उमेदवारी आपल्यालाच यावर ठाम असलेल्या बकाने यांच्या कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून आनंद साजरा केला. देवळी विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे उमेदवार म्हणून राजेश बकाने यांचे नाव जाहीर होताच बकाने यांच्या निवासस्थानासमोर कायकर्त्यांनी घाषणाबाजी करून आतषबाजी करीत ढोलताशाच्या तालावर आनंद साजला केला. ३० वषापासन पक्षबाधणीमध्य मालाचा वाटा उचलनार्या बकाने यांच्या योगदानाची पक्षाने अखेर दखल घेतली अशी भावना कार्यकर्ते व शहरातील नागरिकांनी व्यक्त केली. पुलगाव येथील पक्षमेळाव्यात व्यस्त असलेल्या बकाने यांच्याशी संपर्क केला असता यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. लोक कार्याच्या भांडवलावर यावळी देवळी विधानसभेवर भाजपाचा झेंडा फडकवू असा विश्वास बकाने यांनी व्यक्त केला.