भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, पहिल्या यादीत ९९ नावं
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी पहिली उमेदवार यादी जाहीर कली आह. पहिल्या यादीत उपमख्यमत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे. भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडली होती. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मादी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश होता. दरम्यान आज भाजप उमेदवार यादी जाहीर करत मैदानात उतरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये २८८ जागांच्या वाटपावर चर्चा चालू आहे. जवळपास सर्वच जागांवरील चर्चा निकाली लागली आहे. असे असताना आता भाजपाने एकूण ९९ जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना देखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांना देखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.