पत्रलेखनातून जिल्हाभरात मतदार जागृती

वर्धा/प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये जिल्हाधिकारी राहल कडिल याच मागदशनामध्य जिल्हाभरात पत्रलखनातन मतदार जागतीचा अभिनव उपकम राबविण्यात आला. मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील, कुटुंबातील इतर सदस्य, नोकरी व शिक्षणानिमित्त बाहेरगावी असणारे नातेवाईक यांना विनंती पत्रे लिहिली. सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले होते. जवळजवळ एक लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी या पत्रलेखन उपक्रमामध्ये सहभाग घेतला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अनिल गावीत, जिल्हा स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. मंगेश घोगरे, सहाय्यक नोडल अधिकारी उत्तम खरात, संजय नवले तसेच सर्व तालुका स्वीप नोडल अधिकारी आणि सर्व शाळा व शिक्षक, विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.