भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी- माजी खा. रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राट अशोकांनी विजयादशमी दिवसी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असल्याने त्या दिवसाचे आचित्य साधत १९५६ साली विजया दशमीच्या मुहूर्तावर नागपर मध्य दीक्षाभमीवर समार ५ लाख अनुयायींसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. आणि भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र गतिमान करत “”धम्मचक्र प्रवर्तन” केले असल्याने त्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून महत्व आहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती विरहित समाज व्यवस्था, सामाजिक न्याय व समता प्रथापित करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून माणसकीला श्रष्ठ बनविण्यासाठी बाबासाहेबांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे असे प्रतिपादन माजी खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती देवळी तथा त्रिरत्न बौध्द विहार महिला मंडळ, आंबेडकर नगर, देवळी व्दारा आयोजीत ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन निमीत्य भिमबुध्द गीताचा कार्यक्रम मा.खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाला माजी.नगराध्यक्षा सौ..शोभाताई तडस, डॉ. नरेंद्र मदनकर, रविन्द्र कारोटकर, सौ. शुभांगी कुर्जेकर, रितेश लोखंडे, प्रितम डंभारे, भिमजय म्हैसकर उपस्थित होते. यावेळी डॉ. नरेंद्र मदनकर यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले. ६८ व्या धम्मचक प्रवर्तन दिन निमीत्य शितल स्वरांजली वर्धा व्दारा सदाबहार भीम-बौध्द गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, व्यायामशाळा व बौध्दविहार तसेच देवळी येथे विविध विकासकाम कल्याबद्दल मा.खासदार रामदास तडस याचा भव्य नागरी सत्कार त्रिरतन बुद्ध विहार महीला मंडळ आंबेडकर नगर देवळी याच्या तर्फे करण्यात आला..

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रितेश लोखंडे यांनी केले, संचालन मंगेश दंडारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विनय नाईक यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सम्राट भगत, प्रशिक कांबळे, कुणाल पाटील, दिनेश भगत, अवधूत बेंद्रे, सागर कुडवे, समय भोंगाडे, धीरज मून, सुरज मून, हर्षल लोखंडे, संदेश भगत, गुडलक डंबारे, क्रिश म्हैसकर, सविता भगत, साधना भगत, मनीषा लोखंडे, प्रणाली डंबारे, वर्षा चिचघाटे, चंदा डंबारे, सुलेखा काबळ, भाग्यश्री म्हसकर, प्रांजली वानखड, किरण वानखड, प्रमीला खुंडे, सुजाता पाटील, वनिता वावरे, अर्चना वानखेडे, चंदा भोंगाळे यांनी केले कार्यक्रमाला मोठया संखेने देवळीकर नागरीक उपस्थित होते.