महाविकास आघाडीत मोठी बिघाडी; नाना पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा

मुंबई/प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानेजागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यातअसतानाच आता महाविकासआघाडीत जागावाटपावरुनखडाजंगी होत असल्याचं स्पष्टहोत आहे. कारण, नाना पटोले यापुढे जागावाटपाच्या बैठकीतअसल्यास शिवसेना ठाकरे गटाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीलाउपस्थित राहणार नाहीत, अशीभूमिका शिवसेना ठाकरेंच्यापदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.महाविकास आघाडीतील जागावाटपहे नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे आडत असल्याचं ठाकरेंच्याशिवसेनेचं म्हणणं आहे. विशेषम्हणजे याबाबत दिल्लीतीलकाँग्रेसकडे नाना पटोले यांचीतक्रारही करण्यात येणार आहे.

जागावाटपाची चर्चा ठाकरेंचे नेते हे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी करत आहेत, तिढा असलेल्या जागा लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जावे, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेवरुन व सहभागावरुन आता महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचं स्पष्ट झालंय. महाविकास आघाडीमध्ये विदभातील वाढीव जागांसाठी ठाकरे गट आग्रही असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भात जागा न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये खटके उडाल्याची चर्चा आहे. जागा वाटपाची चर्चा पुढे जात नसल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेविरोधात थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

विदर्भातील काही जागांवर तिढा अद्याप सुटलेला नाही, विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर नाना पटोले अडून बसल्याची तक्रार ठाकरेंच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. विधानसभा निडणुकांच्या अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना या जागांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा, असा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. मात्र, नाना पटोलेयांची भूमिका जागावाटप पूर्ण करतअसताना अडचण निमाण करणारी आहे, असे म्हणत ठाकरेंच्या नेत्यांनीकाँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे हा विषयमांडला असल्याचं सुत्रांनी सांगितलंआहे. तसेच काँग्रेस हाय कमांडने तात्काळ निर्णय घेऊन जागावाटप पूर्ण करावं, अशी ठाकरेंची मागणीआहे. त्यामुळे, आता पुढे काय होईल हे पाहणे महत्वाचे आहे.