वय वर्ष ८५ पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी गृह मतदान सुविधा- राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी जष्ठ नागरिकांमध्य ज्यांचे वय ८५ वर्षापेक्षा अधिक आहे, असे नागरिक व दिव्यांग मतदार यांच्यासह निवडणूक कर्तव्यानिमित्त नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यपध्दती विहित करुन दिली आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणताही मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहू नये यादृष्टीने ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाचा लाभ उपलब्ध करुन दिला जात असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. गृह मतदानासाठी नमुना १२-ड तत्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याचबरोबर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना ही निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यांची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. १२-ड चे फार्म सर्व बीएलओ यांनी काळजीपूर्वक आपल्या भागातील पात्र मतदारांपयत पाहचतील यासाठी अधिक दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक कामाच्या विविध जबाबदारीसाठी कर्तव्यावरअसलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाचीसुविधा भारत निवडणूक आयोगानेदिली आहे.

यासाठी नमुना १२ साठी ज्याची मागणी आली त्याचीपडताळणी करुन त्यांना मतदानपत्रिका दिलेल्या कालमर्यादेतमिळतील यासाठी संबंधीतअधिकाऱ्यांनी काळजी घेतलीपाहिजे. ही संख्या अधिकअसल्याने त्याबाबत योग्य तोसमन्वय साधून मतपत्रिकांच्याआदानप्रदान बाबतची कार्यवाही दिलल्या कार्यपध्दतीनुसारचकरण्याचे त्यांनी निर्देश दिले. टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करु इच्छिणाऱ्या तसेच निवडणूक कर्तव्यासाठी प्रमाणपत्राद्वारे मतदान करु इच्छिणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे नमुना १२ व १२-अ हे एनआयसी मार्फत उपलब्ध करुन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व प्रक्रिया करतांना अडचण भासल्यास जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी त्या अडचणी निरसन करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.