दारूबंदी असलेल्या राज्यात विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव, घराघरांत मृतदेह, अनेकांनी दृष्टी गमावली
पाटणा/प्रतिनिधी विषारी दारू प्यायल्याने बिहारमध्ये मृत्यूंचं तांडव निर्माण झालं आहे. दोन जिल्ह्यातील विविध गावांत जवळपास २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांनी दृष्टी गमावली आहे. यामध्ये मृतांची संख्या वाढणार असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी आतापर्यंत १२ लोकांना अटक केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर, बिहारमधील विरोधी पक्षांनी हा हत्येचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. मंगळवारी खेरवा परिसरात विषारी दारू प्राशन केल्याने आजूबाजूच्या गावातील लोकांची प्रकृती ढासळू लागली. त्यामुळे पीडितांना सिवान, छप्रा आणि पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यत आले. तिथे अनेकांचा मृत्यू झाला. विषारी दारू प्यायल्याने ५० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेहोते. यामध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक होती. मृतांचा आकडा सातत्यान वाढतजात असून अनेक रुग्णांची दृष्टी गेली आहे. तर, अनेकांना उलट्या आणि छातीत दुखत आहे.