आदर्श आचार संहितेच्या कालावधीत प्रस्ताव तपासणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत

वर्धा/प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा (दि.१५) केली असून राज्यात आचार सहिता लागू झाली आह. आदश आचारसंहितेच्या कालावधीत एखाद्या प्रस्तावास मान्यता देणे वा कार्यवाही करण्याबाबत प्रशासकीय विभाग आग्रही असल्यास असे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगास शिफारस करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत करण्यात आली आहे.

त्याबाबतचे शासन परिपत्रक दि. १६ ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आले आहे.या छाननी समितीमध्ये प्रस्तावाशी संबंधित विभागाचे अप्पर मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव किंवा सचिव तसेचसामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्यसचिव (सेवा) हे सदस्य असतील.प्रशासकीय विभागांनी सादर करावयाचे प्रस्ताव छाननी समितीची शिफारस व सदरशिफारशीनुसार मुख्य निवडणूक अधिकारीयांनी भारत निवडणूक आयोगास प्रस्तावसादर करण्याची सर्व प्रक्रिया सीव्हिजीलसंगणकीय प्रणालीवरुन ऑनलाईनपध्दतीने होणार आहे.