विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, २० नोव्हेंबर रोजी मतदान, २३ तारखेला निकाल

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणक आयागान पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या.

२६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारीखा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार असून त्यासाठी १ लाख १८६ तदार कद्रावर मतदान हाणार आह. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय ८५ पेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून दण्यात यणार आह. त्यासाठी त्याना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे एका बाजूला असतील. दुसरीकडे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे असतील.