विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज्ा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
वर्धा/प्रतिनिधी भारत निवडणक आयागान महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा आज (दि.१५) केली असून जिल्ह्यात आचार संहिता लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चार विधानसभा मतदार संघात १ हजार ३४२ मतदान केंद्र असून ११ लाख २८ हजार ३९२ मतदार २० नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. विधानसभा निवडणुका पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशिल असून नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अनिल गावीत यावेळी उपस्थित होते. ४४-आर्वी विधानसभा मतदार संघात १ लाख ३३ हजार २८३ पुरूष मतदार, १ लाख ३१ हजार २२९ महिला मतदार व २ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ६४ हजार ५१४ मतदार आहेत. ४५-देवळी विधानसभा मतदार संघात १ लाख ३८ हजार १५५ पुरुष व १ लाख ३५ हजार ५२२ महिला अस एकण २ लाख ७३ हजार ६७७ मतदार आहेत. ४६-हिंगणघाट विधानसभा मतदार संघात १ लाख ५१ हजार २७४ पुरुष व १ लाख ४५ हजार ५१७ महिला अस एकण २ लाख ९६ हजार ७९१ मतदार आहेत. ४७-वर्धा विधानसभा मतदार संघात १ लाख ४६ हजार ८८६ परूष व १ लाख ४६ हजार ५१३ महिला व ११ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ९३ हजार ४१० मतदार आहेत. जिल्ह्यात पुरूष मतदारांची संख्या ५ लाख ६९ हजार ५९८, महिला मतदारांची संख्या ५ लाख ५८ हजार ७८१ व १३ तृतीयपंथी मतदार असे एकूण ११ लाख २८ हजार ३९२ मतदार आहेत.
इलेक्ट्रानिक्स मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी झाली असूनजिल्ह्यात ३ हजार ४६ बॅलेट युनिट,१ हजार ७०४ कंट्रोल युनिट व १ हजार ८३९ व्हिव्हिपॅट उपलब्धआहेत. ही सर्व मतदान यंत्रे सुरक्षाव्यवस्थेत ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.विधानसभा निवडणुकीसाठीमतदान केंद्रस्तरीय व्यवस्थापन आराखडा, संवाद आराखडा तसेच रुट प्लॅन तयार करण्यात आला असून क्षेत्रीय अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक व समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एकूणमतदान केंद्रापैकी ५० टक्के मतदानकेंद्रावर वेबकास्टींग करण्यातयेणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मतदान केंद्रावर आवश्यकसुविधा उपलब्ध करुन देण्यातआल्या आहेत. यात प्रामुख्याने पिण्याचे पाणी, शेड, शौचालय तसेच दिव्यांग मतदारांकरिता रम्प व व्हिलचअरचा समावश आहे.
इलेक्ट्रानिक्स मतदानयंत्राचे रँडमायजेशन, ईव्हीएमव्हिव्हिपॅटचे ट्रकींर्ग, कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचार संहितेत काय करावे, काय करु नये, तक्रार देखरेख यंत्रणा,माध्यम सनियंत्रण समिती, मतदारजागृती आणि सहभाग कार्यक्रम, निवडणूक विषयक प्रशिक्षण,जिल्हा निवडणूक व्यवस्थापन, ईव्हीएम बाबत जनजागृती, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्ती याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. आचार संहिता लागू झाल्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सार्वजनिक ठिकाण जसे रेल्वे स्टेशन, बसस्टँड, रेल्वेपुल, रस्ते, शासकीय बसेस, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती यावर असलेले राजकीय पक्षाचे व जाहिरात स्वरुपाचे पोस्टर, बॅनर, होर्डिंग, झेंडे ४८ तासांच्या आत काढून टाकण्याच्या सूचना निर्गमित केल्याचे त्यांनी सांगितले. आदर्श आचार संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फ्लाईंग स्कॉड (भरारी पथक), एफएसटी, व्हीडीओ टीम, दारु, रोकड, प्रतिबंधित औषधे यांची सखोल तपासणी, राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत अवैध, नशीले पदार्थाच्या वाहतुकीसंदर्भात भरारी पथक तात्काळ कार्यान्वित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात ४ विधानसभा मिळून एकूण २१ नाके तयार करण्यात आले आहे. या नाक्यांवर स्थिर निगराणी पथक नेमण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. भारत निवडणक आयागान मतदारांच्या सुविधेसाठी विविध मोबाईल प सुरु केलेल आहेत. यात इनकोअर, सुविधाप, सक्षम उमेदावर प, सिव्हीजील, इएसएमएस पचा समावेश आहे. वरील सर्व प हे मतदारांच्या सविधेसाठी असन पारदर्शकव भितीमुक्त निवडणूक पारपाडण्यासाठी याचा उपयोग होणारआहे. मतदारांच्या सुविधेसाठीजिल्ह्यात मतदार सहायताकेंद्राची स्थापना करण्यातआली असून १९५० या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनीयावेळी केले. यत्या विधानसभा निवडणकीतलांबच्या मतदान केंद्राच्यावाहतुकीकरीता मतदानपथकाकरीता छोट्या वाहनाचावापर करण्यात येणार आहे यामुळेलांबचे मतदान पथक कमी वेळातमतदारसंघात पोहोचवून मिडियालामतदानाच्या टक्केवारीची माहिती जलद गतीने पोहोचविण्यास मदत होणार आहे.