अकोल्यात दोन गटांत तणाव, दगडफेक अन् जाळपोळ; पोलिसांसह दंगा काबू पथकंही रस्त्यावर

अकोला/प्रतिनिधी एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून नेतेमंडळी व कार्यकर्ते आमनेसामने येत आहेत. त्यातच, अकोल्यात मे २०२३ मध्ये दंगल झालेल्या हरिहरपेठ भागात पुन्हा दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. या तणावावरुन अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती असून मोठा जमाव रस्त्यावर उतरल्याचंही दिसून आलं. या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळावर मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे. हरिहरपेठ भागात गाडगे महाराजांचा पुतळा आहे, त्या परिसरात ही दगडफेक आणि जाळपोळ सुरू आहे. दोन गटात शल्लक कारणावरून तणाव निमाण झाला असल्याची प्राथमिक माहिती असून पोलिस व सुरक्षा फोर्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.सुरक्षा जवानांच्या पथकांकडूनजमावाला पांगवण्यात येतआहे. दरम्यान, अकाल्यातील हरिहर पठ भागात झालली दगडफेक आणि जाळपोळअकोला पोलिसांचं अपयशआहे. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कुचकामी असून यासंदर्भात गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचं आमदार अमोलमिटकरी यांनी म्हटले.