श्री. संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थान झाल्यामुळे समाजातील बेरोजगार युवकांना सक्षम बनविण्यास मदत- माजी खासदार रामदास तडस
सेलू /प्रतिनिधी संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या संदुबरे जि. पुणे येथील समाधी स्थळाच्या सर्वागिंण विकासाकरिता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातुन भरघोष निधी तथा विकास आराखडा महायुती सरकारच्या माध्यमातुन मंजुर झाले व जे कार्य अनेक वर्षापासून प्रलंबीत होते, ते कार्य आज पुर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाजाच्या वतीने मागणी केल्याप्रमाणे श्री. संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा मत्रीमडळात निर्णय घेण्यात आल्यामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेष करून बेरोजगार तरुणांना सक्षम बनविण्यास तसेच माध्यमातुन रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध होईल व आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणण्याकरिता मदत होईल, आज भवनाचा लोकार्पण होत आहे, या भवनाच्या माध्यमातुन सुध्दा समाजातील तरुण, महिलासाठी आर्थिकदृष्टया सक्षम करण्याकरिता सभासदांनी प्रयत्न करावे, असे यावेळी माजी खासदार रामदास तडस म्हणाले.
श्री. संत जगनाड महाराज मंदीर, वडगांव रोड, सेलू परीसरात श्री. संत संताजी जगनाडे महाराज भवनाचा लोकार्पण सोहळा माजी खासदार रामदास तडस व आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, यावेळी श्री. अशोक कलोडे, श्री. हरिओम चॅरीटेबल ट्रस्ट व श्री. संताजी चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर वाघमारे, सचिव भगवान तितरे, सचिव उकेश चंदनखेडे, संताजी फाउंडेशनचे अध्यक्ष सधिर चाफल, धमुल गुरुजी, रविन्द्र दफ्तरी, दिनेश माहुरे, भुषण पारडकर, वैभव उगेमुगे, पारधी, तेलरांधे उपस्थित होते. राज्यरकारच्या माध्यमातुन वर्धा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव व शहराच्या विकासाठी मोठया प्रमाणात विकास निधीआणला व विकासकामे पुर्णत्वासजात आहे, पुढे सुध्दा वर्धाविधानसभा क्षेत्राचा विकास कामेकरण्यासाठी कटीबध्द असुन या ठिकाणी पुढे सुध्दा निधी देईल असे यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तावीकअध्यक्ष मनाहर सामनाथ याकेले, कार्यक्रमाच संचालन वआभार उकेश चंदनखेडे यांनी केले,कार्यक्रमाला मोठया संख्येने समाजबांधव उपस्थित होते.