सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदू समाजाला आवाहन; म्हणाले, स्वत:च्या सुरक्षेसाठी…
बारन नगर/प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे राजस्थानच्या बारन नगरमधील कृषी उत्पन्न बाजारपेठेत एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणन उपस्थित हात. या कायकमात मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदू समाजाची व्याख्या करताना “भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे’, असा उल्लेख केला. तसेच, मोहन भागवत यांनी यावेळी हिंदू समाजाला एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं. एएनआयनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. रविवारी झालेल्या या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हिंदू कुणाला म्हणायचं यावर भाष्य केलं आहे. भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे. हिंदू हे नाव जरी कालांतराने आलं असलं, तरी आपण इथे प्राचीन काळापासूनराहात आलो आहोत. “हिंदू’ हे नाव इथे राहणाऱ्या सर्वच भारतीय समाजांसाठी वापरलं गेलं होतं. हिंदूंनी सगळ्यांना आपलं मानलं आणि सगळ्यांचा स्वीकार केला. हिंदू तेव्हा सगळ्यांना म्हणाले की आम्ही बरोबर आहोत आणि तुम्हीही तुमच्या जागी बरोबरच आहात, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.