सणोत्सवाच्या पर्वात बालदुर्गेला जीवनदायी भेट सावंगी रुग्णालयाने दिला बालिकेला श्वसनयंत्र संच

वर्धा/प्रतिनिधी “ती’ दिवसभर खेळत बागडत असणारी शाळकरी मुलगी, मात्र रात्री झोपल्यावर तिच्या मेंदूने श्वास घेण्याची सूचना श्वसनयंत्रणेला देणेच अचानक बंद केले. अशा आगळ्यावेगळ्या व दुर्मिळ आजारामुळे सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील बालरोग विभागात भरती झालेल्या या बालिकेला उपचारांनंतर घरी परतताना कृत्रिम प्राणवायू पुरवठा करणाऱ्या यंत्रांचा संच रुग्णालयाने भेट दिला. अमरावती जिल्ह्यातील घाटलाडकी येथील रहिवासी आदिती कल्पना श्रीकृष्ण खराटे (१३ वर्षे) हिला पाच महिन्यांपूर्वी सावंगी रुग्णालयातील बालरोग विभागात भरती करण्यात आले होते. रुग्णाची तपासणी केली असता तिचे दिवसभरातील व्यवहार सर्वसामान्य बालकांसारखे राहत असून दिवसा कोणताही त्रास नसल्याचे आढळले. मात्र, रात्री झोप लागली असताना तिच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याच दिसून आले. बालरोगतज्ञ डॉ. शाम लोहिया यांनी वैद्यकीय तपासणी केली असता ती सेंट्रल हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोमने ग्रस्त असल्याचे निदान झाले. या आजारात झोपेमध्ये मेंदू श्वास घेण्याची सूचना शरीराला देणे विसरत असल्याने धोकादायक परिस्थितीतून रुग्णाला जावे लागते.

हा बालकांना जन्मजात होणारा अतिदुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार असून यात रुग्णाला श्वास घेण्याचा विसर पडता. या आजारात शारीरिक बदलांची लक्षणे दिसून येत नसल्याने आजाराचे निदान करण्यासही अडचण निर्माण होते. आजाराचे निदान झाल्यावर आदितीला बालरोग अतिदक्षता विभागात उपचारांकरिता भरती करण्यात आले. या काळात डॉ. शाम लोहिया यांच्यासह बालरोग विभाग प्रमुख डॉ. अमर ताकसांडे, पदव्युत्तर विभाग संचालक तथा बालरोगतज्ञ डॉ. जयंत वाघ, डॉ. शैलेश वांदिले, डॉ. रेवत मेश्राम व अन्य निवासी डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करीत या रुग्णाची काळजी घेतली. पाच महिन्यांनंतर तिच्या तब्येतीत सुधारणा दिसून आल्यावर तिला सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हा धोका कधीही उद्भवू शकतो याची जाणीव ठेऊन उपचारांची आगामी रूपरेषा ठरविण्यात आली. तिला स्वतःच्याघरी सहजतेने वापरता येईल, असाकृत्रिम प्राणवायू पुरवठा करणाऱ्या यंत्रांचा संच भेट देण्याचे बालरोग विभागातील डॉक्टरांनी ठरविले. याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात आली व मदतीचे आवाहनही करण्यात आले.

बालरोग विभागाच्या याआवाहनाला प्रतिसाद देत दत्तामेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थाअभिमत विद्यापीठाचे प्रधान सल्लागारसागर मेघे, संचालक डॉ. तृप्तीवाघमारे, कुलसचिव डॉ. श्वेता काळेपिसूळकर, उद्योजक प्रीती श्रीकांतराठी, नीरज लखोटिया, लायन्स क्लबच्या अध्यक्ष डॉ. मंदाकिनी जवादे, डॉ. स्वप्नील अलोणे, डॉ.उल्हास दुधेकर आणि बालरोगविभागातील डॉक्टरांनी आर्थिकसहकार्य केले. प्राप्त मदतीतूनव्हेंटिलेटरसह ऑक्सिजन सिलेंडर,मॉनिटर, सक्शन ही उपकरणेआदिती खराटे हिला कुलगुरू डॉ.ललितभूषण वाघमारे, विशेष कार्यअधिकारी संजय इंगळे तिगावकर व सहकाय करणाऱ्या मान्यवराच्याहस्ते भेट देण्यात आली. तत्पूर्वी, अतिदक्षता विभागात तज्ज्ञांद्वारेआदिती व तिच्या आईवडिलांना या उपकरणांचा वापर कसा करावायाबाबत ७ दिवस प्रशिक्षण दण्यातआले. तसेच आकस्मिक प्रसंगी गैरसोय होऊ नये म्हणून गावातीलचबीएएमएस डॉक्टरांना व्हेंटिलेशन वापराबाबत माहिती देण्यात आली. आदितीच्या गळ्यात सध्यालागलली कत्रिम श्वासनळीकालांतराने काढून तिला पूर्ववत नैसर्गिकरित्या श्वास कसा घेतायेईल, यासाठी प्रयत्नशीलअसल्याचे डॉ. शाम लोहिया यांनीसांगितले.