मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

मुंबई/प्रतिनिधी आगामी विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातीलराजकारण चांगलंच तापलं आहे.एकीकडे विरोधक राज्यातील विविध विषयांवरून सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत, तर दुसरीकडे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्णयाचा धडाका लावलाआहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्याअध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.४)राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

या बैठकीत मच्छिमार कल्याणकारीमहामंडळाची घोषणा करण्यात आली असून या महामंडळासाठी ५० कोटी मंजूर करण्यात आले. तसेच, प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसानकेल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख दंडाची तरतूदकरण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. दरम्यान, गेल्या आठवड्यातझालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने ३८ निर्णय घेतले होते.यामध्ये सरकारने देशी गायींना”राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषितकरण्याचा निर्णय घेतला होता. तसेच,धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठीपरवडणारी भाडेतत्त्वावरीलघरांच्या योजनेस सरकारने मंजुरीदिली होती.