बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू; आत्महत्या की एन्काऊंटर?
बदलापूर/प्रतिनिधी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली की एन्काऊंटर करण्यात आला याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी तळोजा जेलमध्ये नेत असताना हा सगळा प्रकार घडला. सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने तळोजा जेलमध्ये उपस्थित पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला आणि तीन गोळ्या झाडल्या.
या झटापटीत एका पोलीस कर्मचाऱ्यालाही गोळी लागली आणि जखमी झाला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षण करताना त्याच्यावर गोळी झाडली ज्यामध्ये तो जखमी झाला होता. अक्षय शिंदेची कोठडी आज संपली असून त्याला कोर्टात नेलं जात होतं. अक्षय शिंदेला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेने गोळ्या झाडल्यानंतरपोलिसांनी प्रत्युतरात गोळीबार केला. गोळी लागल्याने अक्षय गंभीर जखमी झाला होता. त्याला कळवा रुग्णालयातनेण्यात आलं होतं जिथे त्याचा मृत्यू झाला.