पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात; शहरात सुरक्षा व्यवस्था तैनात
वर्धा/प्रतिनिधी केंद्र शासनाच्या पी. एम. विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्तीसोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या उपस्थितीत २० सप्टेंबरला स्वावलंबी मैदानात होणार आहे. त्याकरिता शहरात तग़डी सुरक्षाव्यवस्था राहणार असून, शहरातीलवाहतुकीच्या मार्गातही बदलकरण्यात आला आहे. तसेचवाहनतळांचीही निश्चिती करण्यात आली आहे, याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनपोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनीकेले आहे.
या कायक्रमास जिल्ह्यातीलतसेच जिल्ह्याबाहेरील नागरिकमोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे २० सप्टेंबर रोजी सकाळी ६:०० ते रात्री ९:००वाजेपर्यंत वाहतूक व रहदारीचा प्रश्ननिर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अचाधित राहावी, म्हणूनसभास्थळाकडे जाणारा रहदारीचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठीतसेच पार्किंगस्थळाकडे जाणारामार्ग कार्यक्रमाकरिता येणाऱ्यावाहनांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्यावाहनांकरिता रहदारी मार्गात बदल करण्यात आला आह. जड वाहनाना शहरामध्ये प्रवेशबंदी केली आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने व अतिमहत्वाच्या सेवा देणाऱ्या वाहनांना यामधून सूट देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.