आमदार समीर कुणावार यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार

वर्धा/प्रतिनिधी महाराष्ट्र विधिमंडळाचे सलग सहा वषाच परस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दोन्ही सभागृहांतील उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषणासाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. हिंगणघाट येथील भाजप आमदार समीर कुणावार यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला असून या श्रेणीतील ते विदर्भातील एकमेव आमदार ठरले आहेत. ते म्हणतात की विविध निकषावर ही निवड केल्या जाते. विधिमंडळाची उन्हाळी, पावसाळी व हिवाळी तसेच एखादे विशेष असे चार अधिवेशने होतात.

आमदार झाल्यानंतर मी या सर्व अधिवेशनात हजर राहिलो असून माझ्या उपस्थितीचे प्रमाण ९९ टक्के आहे. अधिवेशनादरम्यान वडिलांचे निधन झाले होते. म्हणून गैरहजर राहिलो. तसेच सलग तीन अधिवेशनात मला तालिका अध्यक्षपद सांभाळण्याची जबाबदारी मिळाली होती. ती उत्कृष्टपणे सांभाळल्याची पावती मिळाली होती. त्यात सर्वाधिक गुण मिळाले. सर्वाधिक कामकाज या काळात झाले. तालिका अध्यक्ष असताना सर्वाधिक लक्षवेधी प्रश्न लागले. अन्यथा तीन किंवा चार प्रश्न साधारणपणे लागत असल्याची आकडेवारी आहे. त्यात आपण सरस ठरला, याचा आनद वाटता.

सर्वात अधिक तारांकित प्रश्न विचारले. सभागृहात किती वेळ बसता याची पण नोंद होते. हा बहुमान हिंगणघाटकरांनी दिलेल्या प्रेमाची मी पावती समजतो. विदर्भाचा हा बहुमान म्हणता येईल. अन्य उत्कृष्ट भाषण म्हणून पुरस्कृत झाल्याचे त्यांनी नमूद केले. २०१८ ते २०२४ या सहा वर्षांतील कामगिरीचे मूल्यमापन करीत प्रत्येक वर्षाचे स्वतंत्र पुरस्कार देण्यात आले. विधिमंडळ कार्यालयातून पुरस्कृत आमदारांना फोनद्वारे ही माहिती देण्यात आली. अधिकृत पत्र पण पाठविण्यात आल्याची माहिती आहे. हे पुरस्कार लवकरच आयोजित होणाऱ्या एका समारंभात देण्यात येणार आहे.

२०२३ – २४ या वर्षासाठी उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार विधानसभा श्रेणीतून शिवसेनेचे रमेश बोरनारे, काँग्रेसचे अमीनपटेल, भाजपचे राम सातपुते तर विधान परिषद श्रेणीतून राष्ट्रवादीचेअमोल मिटकरी, भाजपचे गोपीचंदपडळकर रमेश पाटील यांनामिळाले. तसेच उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार काँग्रेसचे कुणाल पाटील,भाजपच्या श्वता महाल व राष्ट्रवादीचप्राजक्त तनपुरे यांना जाहीर झाला.अन्य पाच वर्षांचे पण पुरस्कार जाहीर झाले आहेत. आमदारसमीर कणावार याना २०२२ – २३या वर्षासाठी उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कारमिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनहोत आहे.