वर्ध्यात दारू पुरवठा करणाऱ्या नागपूरच्या बार मालकावर गुन्हा

वर्धा/प्रतिनिधी वर्ध्यात दारूबंदी असूनही मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत असल्याचे लपून नाही. वर्धा लगत नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात दारूची चोरटी वाहतूक होत असल्याचे दिसून येते. त्याला अटकाव घालण्यासाठी पोलीस दलाने बाहेरील जिल्ह्यातील परवाना धारक दारू विक्रेत्यावर जाळे टाकणे सूरू केले आहे. या प्रकरणात नागपूर जिल्ह्यातील व वर्धेलगत असणाऱ्या वडगाव येथील ग्रीन व्हिलेज बारचा मालक समीर जायस्वाल याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करीत त्यास आरोपी केले आहे.

समुद्रपर परिसरात माठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री होत असल्याचे दिसून येत असल्याने पेट्रोलिंग सुरू झाली. शेडगाव चौरस्ता येथे राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचण्यात आला. तेव्हा पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा कारला (एक्सयूव्ही ५०० – एम एच ४९ बी ८४४६) अडवील्यावर कारचालकाची चौकशी करण्यात आली. त्याचा सोबती बाजूस बसून असलेला हा पोलिसांचा सापळा लक्षात येताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.

मात्र या गाडीत कोकण प्रीमियम, टँगो पंच, रॉयल स्टॅग, ओसी ब्लू असा देशी विदेशी दारूचा साठा आढळून आला. तो साडेपाच लाख रुपये किमतीचा आहे. तसेच गाडी, मोबाईल व दारुसाठा मिळून २१ लाख २० हजार रुपय किमतीचा मद्दमाल जप्त करण्यात आला आहे. कारचालक हा दारुसाठा हिंगणघाट यथील आकाश उफ टिन्या गवळी याच्यासाठी घेऊन चालला होता. त्याच्याच सांगण्यावरून दारुविक्री व वाहतूक करीत असल्याचे कर चालकाने सांगितले. आरोपी अमरदीप जीवणे रा. संत कबीर वॉर्ड हिंगणघाट, तेजस मेश्राम, टिन्या गवळी व बारमालक जायस्वालविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेआहे.

पोलीस अधीक्षक अनुराग जैन,अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोदचौधरी, उपनिरीक्षक उमाकांत राठोड तसेचमनोज धात्रक, अरविंद येनूरकर, अभिषेकनाईक, विनोद कापसे, मुकेश ढोले यांनी कारवाई केली आहे. नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात झालेली ही पहिलीच धडक कारवाई होय. जिल्ह्यातदारूचा महापूर रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस खात्यावर राहिले आहे. स्थानिक पातळीवर गावठी दारूचे अड्डे छुप्यापद्धतीने सुरू असतात. त्यातच दारूबंदी नसलेल्या जिल्ह्यातून अवैध मार्गाने दारूचेपाट वाहत असतात.