वर्धेत महसूल विभागाचे नुकसान

वर्धा/प्रतिनिधी बांधकाम विभागाच्या वतीने विकास कामांसाठी काढण्यात येणार्या निविदांमध्ये बाहेरच्या ठेकेदारांना प्राधान्य देण्यात येत आहे. मर्जीतील ठेकेदारालाच काम मिळावे यासाठीचे नियोजन केले जाते. त्यामुळे राज्य शासनाच्या महसुल विभागाचे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव शेखर शेंडे यांनी दिली. यावेळी काँग्रेसचे माजी सचिव प्रवीण हिवरे यांनी स्थानिक हॉटेल रसोयी येथे २२ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शड पढ म्हणाल की, वध त सुशिक्षित बेेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही बाहेरच्या ठेकेदारांना कामं दिली जातात.

परंतु, ज्या ठेकेदारांना कामं दिल जातात. तही निविदामध्य असलेल्या अटी व शर्थीर्ची पुर्तता करीत नाहीत. उल्हासनगर येथील इंद्रदीप कंन्ट्रक्शन कंपनीला कारला चौक ते राष्ट्रीय महामार्ग नं. ३६१ (व्ही.आर -९) या मार्गाचे काम दिले आहे. मात्र, टेंडर प्रक्रीयेमध्येच खोटी माहिती देण्यात आली. वर्क ऑर्डर प्रमाणे काम न करता निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले. त्यामुळे कंन्ट्राटदार व संबंधीत अधिकार्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही १५ जून रोजी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली असल्याची माहिती हिवरे यांनी दिली. त्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता ए.एम. मुत्यलवार यांनी ५ जून रोजी पंचनामा केला असता इंद्रदीप कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्लॉन्ट १० दिवसापासन बंद, करारनाम्यात दर्शविण्यात आलल्या अटींनुसार प्लान्टमध्य चिलिंग प्लान्ट आढळन आला नाही, याशिवाय अनेक दृष्टी असल्याचा अहवाल सादर केला आहे. याच विभागच्या अधिकार्याने पचनामा केला.

त्यामुळे खाट आरोप म्हणतात येणार नाही. ५०० कोटींचे कामं बिलो गेले असल्याने सरकारचा १२५ कोटी रुपयांचा महसुल बुडाला असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंबोरे यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की, सर्व निविदा आन लाइन निघतात. त्याला डिजिटल लाक कल जात. टडरची तारीख संल्यानंतर दुसर्या दिवशी ते आम्ही उघडतो. विशेष म्हणजे हे टेंडर आमच्याकडे येत नाहीत. ते महाटेंडरवर जातात. त्यामुळे टेंडर कोण भरतं याची आम्हाला कल्पना नसते. टेंडर कोणीच देऊ शकत नाही. त्याहीनंतरही ऑब्जेक्शन घेण्याची प्रत्येकाला अधिकार आहे. अशी माहिती अंबोरे यांनी दिली.