स्थानिक प्रश्नांसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक

वर्धा/प्रतिनिधी संघटना प्रतिनिधींची दोन वर्षांपासून तक्रार निवारण सभा न घेतल्याने अनेक स्थानिक प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच शासननिर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्याअधिकाऱ्यांवर कारवाई करा, यासहअनेक स्थानिक प्रश्नांसाठी अंगणवाडीकर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतलीआहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊननिवेदन देण्यात येणार असून कार्यवाहीन झाल्यास तिव्र आंदोलन करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. म.रा. अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनची जिल्हा बैठक आयटक कामगारकेंद्र, बोरगाव (मेघे), वर्धा येथे जिल्हाध्यक्षविजया पावडे यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्याध्यक्ष दिलीप उटाणे यांच्या उपस्थितीतपार पडली. प्रारंभी अ.भा. किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस अतुलकुमार अंजान व अंगणवाडी युनियनच्या पार्वताबाई जुनघरे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हा सचिव वंदना कोळणकर यांनी मागील जिल्हा बैठकीचे इतिवृत्तवाचून दाखवत एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी ५ जुलै २०१८ शासन निर्णयाप्रमाणे प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व अंगणवाडी कार्यकर्ते विमा योजनेबाबत चर्चा करण्यात आली.

या शासन निर्णयाबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि. प. तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसते. जिल्ह्यातील अनेक आयटक महिला आजारी पडल्या, मृत्यू झाल्यात, त्यापैकी एकालाही लाभ मिळाला नाही. या शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून करणार असल्याचे राज्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी सांगितले. तसेच प्रवास भत्ता काही प्रकल्पात २००१८ पासून देण्यात आलेला नाही. सीबीई कार्यक्रमाच्या निधीमध्ये घोळ असून प्रकल्प स्तरावर वेगवेगळे निर्णय घेतले जाते. गरोदर माता व सहा महिने ते तीन वर्ष मुलांसाठी येणारा आहार दर्जेदार नसल्याची ओरड आह. काही पयवक्षिका हतपरस्पर त्रास दत असल्याच्या तक्रारी आहे. कुठलेही लेखी