रेल्वेची ओव्हरहेड केबल चोरट्यांना अटक

देवळी/प्रतिनिधी देवळी-कळंब रेल्वे सुरू होऊन ३ महिने होताच चोरट्यांनी चक्क रेल्वे चालणारी तांब्याची ओव्हरहेड वायर तोडून लंपास केली होती. रेल्वे पोलिसांनी या चोरट्यांना अटक करून केबल जप्त केला. ४ मे रोजी देवळी रेल्वे मार्गावर १०५ मिटर तांब्याची वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होता.

या घटनेची नोंद वर्धा रेल्वे पोलिसांनी घेतली. वर्धा येथे नव्यानेच रुजू झालेले रेल्वे पोलिस अधिकारी कनोजिया यांनी तपासाची चक्र फिरवली. देवळी येथील किरण, प्रतीक,अक्षय, अविनाश आणि यश या पाच चोरट्यांना वर्धा रेल्वे पोलिसांनीअटक केली. त्यांच्याकडून४० हजार रुपये किमतीचा१०५ मिटर तांब्याचा वायर जप्त केला. ही कारवाई रेल्वेचेवरिष्ठ पोलिस अधिकारी कनोजियायांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षकढिगोले, घोडेकर, उंबरे,इंगोले, कोल्हे आदींनी केली.दरम्यान, वधा रेल्व स्थानकावरसोनसाखळी चोरणार्या प्रशांत नामकचोरट्यालाही रेल्वे पोलिसांनीताब्यात घेतले.