वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान

 वर्धा/प्रतिनिधी ०८ वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी दि. २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघासाठी १६ लाख ८२ हजार ७७१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यामध्ये ८ लाख ५८ हजार ४३९ पुरूष तर ८ लाख २४ हजार ३१८ महिलाचा समावश असून १४ तृतीयपंथींचा समावेश आहे. दिव्यांग मतदार ११ हजार ७८६ असून ८० वर्षावरील मतदारांची संख्या २५ हजार २२ आहे. तर १९८९ मतदान केंद्र तसेच ८ सहायकारी मतदान केंद्र असे एकूण १ हजार ९९७ मतदान केंद्र असणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज्ा झाली असून वर्धा लोकसभा मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जबाबदारी अधिकारी, कर्मचारी समर्थपणे पार पाडतील, असाविश्वास जिल्हा निवडणूक अधिकारीतथा जिल्हादंडाधिकारी राहुलकर्डिले यांनी दिला आहे. लोकशाहीच्या महोत्सवामध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करुन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारीराहुल कर्डिले यांनी केले आहे.