सावंगी मेघे रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण “त्या’ दोघींच्या अवयवदानाने मिळाले गरजूंना नवजीवन

वर्धा/प्रतिनिधी “त्या’ दोघीही यवतमाळ जिल्ह्यातल्या, दोघीही कुटुंबासाठी शेतीत राबणाऱ्या, दोघींनाही दोन दोन अपत्ये, आठ दिवसांच्या अंतरान दाघींनाही रुग्णालयात भरती करण्यात आले, मात्र दोघींचाही वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांच्या चमूला तपासणीअंती ‘ब्रेन डेड’ जाहीर करावे लागले. सर्व उपाय संपल्यानंतर अवयवदानासाठी त्या दोघींच्या परिवारातील सदस्यांची अनुमती घेण्यात आली. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना नातेवाईकांनी अवयवदानाला संमती दिली आणि त्या दोघींच्या मरणोत्तर अवयवदानाने चौघांना नवजीवन प्राप्त झाले. गत आठवड्यात कळंब तालुक्यातील मसळी या गावातील रहिवासी मनीषा कोकांडे (वय ३० वर्षे) यांना अपघातात गभीररित्या जखमी झाल्यामळे सावगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आल. शतातील कामे आटोपून कळंब येथून दुचाकीने घरी परतताना रस्त्यात गाडी उसळली आणि त्या खाली पडल्या. त्यांना प्रथम यवतमाळ येथील रुग्णालयात नेण्यात आले व तेथील डॉक्टरांच्या सूचनेनुसार सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात भरती केल्यावर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु डोक्यातील अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. त्यांची प्रकृती न्यूरोलॉजीकलदृष्ट्या खालावत गेली. तज्ज्ञांच्या चमूने तपासणी केली असता त्याचा मद पणपण मत झाल्याच स्पष्ट झाल. वर्षभरापूर्वीच मनीषाच्या पतीचे निधन झाले असताना पाच आणि तीन वर्षांच्या तिच्या दोन मुलांवर पुन्हा काळाने आघात केला. तिच्या जिवंत राहण्याच्या शक्यता पूर्णतः संपल्याने अखेर रुग्णालयातील समन्वयक डा. विठ्ठल शिंद व डा. रूपाली नाइक यानी समपदशन करीत मनीषाच्या वध्द मातापित्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत अवयवदान करण्यास विनंती केली. मनीषाची आई मंदा व वडील रमेश पेंदारे यांनी सामाजिक भान जोपासत अवयवदानासाठी संमती दिली. झेडटीसीसीअर्थात क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या परवानगीने नंतरची कार्यवाहीकरण्यात आली. मनीषाच्या अवयवदानातूनप्राप्त झालेल्या एका किडनीचे सावंगीरुग्णालयातच उपचार घेणाऱ्या ४९ वर्षीय गरजू स्त्रीरुग्णावर यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आले. तर दुसरी किडनी नागपुरातीलअन्य रुग्णालयात भरती असलेल्या २३वर्षीय तरुणीवर प्रत्यारोपित करण्यात आली.

या अवयवदानाला आठ दिवसांचाकालावधी लोटत नाही तर पुन्हा एकदा अवयवदानासाठी सावंगी रुग्णालयालापुढाकार घ्यावा लागला. वणी तालुक्यातीलसेलू (शिरपूर) येथील शेतमजुरी करणाऱ्या सुधा गुहे (४३ वर्षे) यांना गत शुक्रवारी (दि.१९) ब्रेन हॅमरेजमुळे गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले. न्यूरो विभागाद्वारे तातडीने तपासण्या करण्यात आल्या असता मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. वैद्यकीय उपचार सुरू असतानरुग्णाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर डॉक्टरांच्या चमूने रुग्णाच्या मेंदूपेशी मृत झाल्याचे घोषित केले. रुग्णाची अवस्था लक्षात घेऊन समुपदेशकांनी पती संजय, मुली नेहा व मानसी यांना परिस्थितीचीकल्पना दिली. त्यांनी आप्तस्वकीयांशीविचारविनिमय करीत हृदय, यकृत (लिव्हर),मूत्रपिंडे (किडनी) व फुफ्फुसे हे अवयव दानकरीत असल्याची लेखी सहमती दिली. गुहेकटबान घतलल्या पढाकारामळ सधा याच्यअवयवदानातून एक किडनी नागपूर येथील न्यू इरा हॉस्पिटलमधील ३८ वर्षीय महिला रुग्णाला प्राप्त झाली तर याच रुग्णालयातील४१ वर्षीय पुरुष रुग्णावर लिव्हर प्रत्यारोपण करण्यात आले. क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वयसमितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, सचिवडॉ. राहुल सक्सेना, सावंगी रुग्णालयाचेमुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखरमहाकाळकर, विशेष कार्य अधिकारीडॉ. अभ्युदय मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. अवयव प्रत्यारोपणात शल्यचिकित्सक,नेफ्रोलॉजिस्ट, बधिरीकरणतज्ज्ञ, परिचारिकायांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली तर रुग्णालय व्यवस्थापन, पोलीस प्रशासन,प्रत्यारोपण समिती, समन्वयक, प्रशासकीय अधिकारी, वाहन चालक याच्या चसर्वतोपरी सहकार्य केले.