मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशभरात सीएए कायदा लागू, अधिसूचना प्रसिद्ध

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मादींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आज सीएए संदर्भात मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांपासून प्रलंबितअसलेला सीएए कायदा देशभरात लागू केला असून, त्या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीआहे. सीएए अंतर्गत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येहोणाऱ्या छळामुळे भारतात आलेल्यागैर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीयनागरिकत्व मिळणार आहे. ३१डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आलेलेहिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशीआणि ख्रिश्चन भारताचं नागरिकत्व घेऊ शकतात.